शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदच्या जमात-उद-दावा संघटनेवर पाकिस्तान घालणार कायमची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 15:14 IST

दहशतवादविरोधी कायद्यात बदल करण्यासाठी विधेयक आणण्याची तयारी पूर्ण

दहशतवादी संघटनांना आश्रय देण्यासाठी बदनाम असणारा पाकिस्तान आता जमात-उद-दावा संघटनेवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यासाठी पाकिस्तान सरकार एक विधेयक आणणार आहे. या विधेयकामुळे गृह मंत्रालयाच्या वॉचलिस्टवर असणाऱ्या इतर दहशतवादी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींवरही बंदी येईल. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी एक अध्यादेश जारी केला होता. या माध्यमातून त्यांनी गृह मंत्रालयाच्या वॉचलिस्टवर असलेल्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्याची सूचना केली होती. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारकडून अध्यादेश आणण्याची तयारी केली जात आहे.1997 च्या दहशतवादविरोधी कायद्यात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून विधेयक आणले जात आहे, असे वृत्त 'डॉन' या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. उद्यापासून (सोमवार) पाकिस्तानच्या संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाऊ शकते. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात  कायदा मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे हे विधेयक तयार करताना पाकिस्तानी लष्करालाही विश्वासात घेण्यात आले. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केला आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान सरकारने दहशतवादी संघटनांभोवती फास आवळण्याची तयारी सुरु केली आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान