शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्ताननं केलेल्या स्ट्राईकनंतर इराण भडकला; दोन्ही देशांनी उचललं घातक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:55 IST

जशास तसं या मार्गाने दोन्ही देश एकमेकांवर वार पलटवार करत आहेत. परंतु ही स्थिती पहिल्यांदाच नाही तर याआधीही इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून आले होते

पाकिस्ताननंइराणवर स्ट्राईक केल्यानंतर आता इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. इराणने पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पाकला तातडीने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने सूत्राच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. इराणने मंगळवारी पाकिस्तानातील बलूचिस्तान इथं एअरस्ट्राईक केला होता. त्यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर या हल्ल्याला पलटवार म्हणून पाकिस्तानने गुरुवारी सकाळी इराणमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन केले. त्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. 

जशास तसं या मार्गाने दोन्ही देश एकमेकांवर वार पलटवार करत आहेत. परंतु ही स्थिती पहिल्यांदाच नाही तर याआधीही इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून आले होते. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटलंय की, आम्ही अनेकदा इराणमधील दहशतवाद्यांबाबत तिथल्या सरकारशी बोललो. परंतु त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली नाही. आम्ही ही कारवाई मूळ पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले करण्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर केली आहे. सर्व धोके लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

इराणनेही केला एअरस्ट्राईक इराणच्या सरकारी वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी कुहे परिसरात असलेल्या जैश उल अदलच्या दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. ही ठिकाणे मिसाईल आणि ड्रोन हल्ले करून उद्ध्वस्त करण्यात आली. दहशतवादी संघटना जैश उल अदलला आर्मी ऑफ जस्टिस नावानेही ओळखलं जाते. २०१२ मध्ये स्थापन झालेली ही एक सुन्नी दहशतवादी संघटना आहे. जी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून चालवली जाते. इराणकडून झालेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने इराणला इशारा दिला. 

पाकिस्ताननं म्हटलं की, दोन्ही देशात चर्चा सुरू असताना इराणने अशाप्रकारे ही कारवाई केली आहे. इराणने सीमेचे उल्लंघन केले आहे जे स्वीकारलं जाऊ शकत नाही. पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या हल्ल्याचा कडाडून निषेध केला. हा एकतर्फी हल्ला असून एका चांगल्या शेजारील राष्ट्राच्या संबंधांसाठी योग्य नाही. हा हल्ला एकप्रकारे दोन्ही देशांमधील नाते आणि विश्वास गंभीरदृष्ट्या कमकुवत करू शकतो असं पाकिस्ताननं सांगितले आहे. 

टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तान