पाकिस्‍तानात नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा, बँक ऑफ पाकिस्तानची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 03:36 PM2024-01-30T15:36:50+5:302024-01-30T15:37:27+5:30

अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी आणि बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

Pakistan New Currency Notes: Demonetization in Pakistan; New notes coming, Bank of Pakistan announcement | पाकिस्‍तानात नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा, बँक ऑफ पाकिस्तानची घोषणा

पाकिस्‍तानात नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा, बँक ऑफ पाकिस्तानची घोषणा

Pakistan New Currency Notes: पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तान मोठ्या रोखीच्या समस्येला तोंड देत आहे. याशिवाय, देशात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होतोय. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये 20 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणतात की, सुरक्षेचा विचार करुन नवीन नोटा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह जारी केल्या जातील. 

ते पुढे म्हणाले की, चलन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोटांचे डिझाइनदेखील बदलण्यात येणार आहे. नवीन नोटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रगत असतील, ज्यामुळे बनावट नोटा आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट फरक करता येईल. याचा उद्देश पाकिस्तानची चलन प्रणाली, व्यवसाय आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. जुन्या नोटा एकदम बंद होणार नाहीत, पण त्यांच्या जागी हळूहळू नवीन नोटा आणल्या जातील. 

नोटांची नवीन सीरिज येणार
पाकिस्तानमध्ये सध्या चलनात असलेल्या नोटा 2005 पासून जारी केलेल्या नोटांच्या बॅचच्या आहेत. या मालिकेत 20, 50, 100, 500, 1000 आणि 5000 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. मात्र आता पाकिस्तान सरकार नोटांची नवी मालिका आणणार आहे. नवीन फीचर्स असलेल्या नोटांचे स्कॅनिंग किंवा फोटोकॉपी करून बनावट नोटा छापल्या जाऊ नयेत म्हणून पाकिस्तान हे करत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान हळुहळू चलनात असलेल्या जुन्या नोटा बाद करुन नव्या नोटा आणणार आहे.

नोटाबंदी का झाली नाही?
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा विश्वास आहे की, बनावट चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे आणि त्यामुळे भूमिगत अर्थव्यवस्था प्रचलित झाली आहे. नवीन चलन छापून पाकिस्तानला या दलदलीतून बाहेर पडायचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सहजतेने पार पडावी, लोकांना नोटा बदलून घेताना कोणतीही अडचण येऊ नये आणि कोणत्याही आर्थिक घडामोडींवर परिणाम होऊ नये, हे लक्षात घेऊन नोटाबंदी अचानक केलेली नाही. नोटाबंदीपूर्वीच अर्थव्यवस्था आणखी खाली जाण्याची भीती आहे, त्यामुळे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने हळूहळू नवीन नोटा छापण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

Web Title: Pakistan New Currency Notes: Demonetization in Pakistan; New notes coming, Bank of Pakistan announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.