शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 7:35 PM

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे आणि निवडणुका वेळेपूर्वी होणार आहेत.

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची तारीख 9 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. काळजीवाहू पंतप्रधानासाठी चार ते पाच नावांवर एकमत झाले आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे आणि निवडणुका वेळेपूर्वी होणार आहेत.

पाकिस्तानी मीडियानुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले की, काळजीवाहू पंतप्रधानांसाठी पीपल्स पार्टीची चार दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत चार ते पाच नावांवर एकमत झाले. चर्चेनंतर नावे नेतृत्वाकडे जातील. काळजीवाहू पंतप्रधानांसाठी दिलेली नावे प्रतिष्ठेचे सामान्य नागरिक आहेत. एक राजकारणाशी संबंधित आहे, तर एका व्यक्तिमत्त्वाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत निवडणुका होतील. सध्याच्या सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण झाला असता तर ६० दिवसांत निवडणुका झाल्या असत्या.

दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परतण्याची तयारी जवळपास सुरू झाली आहे. ते युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर लंडनमध्ये पत्रकार परिषदेत पाकिस्तानात परतण्याची तारीख आणि रणनीती जाहीर करतील. नवाझ शरीफ पुढील ४८ तासांत लंडनला परततील. याठिकाणी ते उच्च नेतृत्वाशी सल्लामसलत करून रणनीती आखणार आहेत. नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.

निवडणुकीशी संबंधित सर्व नियोजन स्वत: नवाझ शरीफ करत आहेतमीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाझ शरीफ मायदेशी परतल्यावर लाहोरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पुढील निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निवडणुकीशी संबंधित सर्व नियोजन नवाझ शरीफ स्वत: करत असून पक्षातील कोणत्या नेत्याला जबाबदारी दिली जाईल, याची यादी तयार करण्यात आली आहे. याचबरोबर, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मित्रपक्षांशी चर्चा करून १२ ऑगस्टपूर्वी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली जाईल, असे आधीच सांगितले होते. पुढील निवडणुकीची तारीख निवडणूक आयोग जाहीर करेल, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकNawaz Sharifनवाज शरीफ