शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोर्‍या मुलींवर बलात्कार करतात पाकिस्तानी..., ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा खुलासा; शाहबाज सरकार भडकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:16 IST

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारच्या विधानांवरून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे...

इस्‍लामाबाद - ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी नुकतीच स्काय न्यूजला एक मुलाखत दिली होती. यात त्यांनी ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांवर गंभीर आरोप केला होता. पाकिस्तानी तरुण ब्रिटनमध्ये गोऱ्या ब्रिटिश मुलींना नुकसान पोहोचवतात. तसेच काही ब्रिटिश पाकिस्तानी यूकेमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाचे नेटवर्क चालवतात, असे त्यांनी म्हटले होते. यावर पाकिस्तान चांगलाच भडकला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री ब्रेव्हरमन यांचे वक्तव्य 'भेदभाव करणारे आणि झेनोफोबिक' असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारच्या विधानांवरून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

पाकिस्‍तानचा इशारा - ब्रेव्हरमन यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहारा बलोच म्हणाल्या, 'असे वक्तव्य धोकादायक सवयींना प्रोत्साहन देईल.' याच बरबोर, ब्रेव्हरमन यांना नॅशनल सोसाइटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रननेही (NSPCC) इशारा देण्यात आला होता, की लैंगिक छळ करणारे केवळ 'एकाच बॅकग्राउंडचे नाहीत. केवळ वंशिक दृष्ट्या विचार करून बाल शोषणाचा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल.

काय म्हणाल्या होत्या ब्रेव्हरमन? -ब्रेव्हरमन म्हणाल्या होत्या, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यां लोकांच्या समूहात जवळपास सर्वच ब्रिटिश-पाकिस्तानी लोक आहेत. अधिकाऱ्यांनी समाजातील कोणत्याही घटकाचे मन दुखावले जाणार नाही याची अत्यंत काळजी घेत, अवलंबल्या गेलेल्या राजकीय धोरणांमुळे आणि वर्णद्वेषी तथा धर्मांध म्हटल्या जाण्याच्या भीतीने या गुन्ह्यांकडे डोळेझाक केली आहे.

ब्रेव्हरमन स्‍काच न्‍यूजसोबत बोलताना म्हणाल्या, 'गोर्‍या मुली कधी-कधी अडचणीत असताना त्यांच्यावर बलात्‍कार केला गेल्याचे, त्यांना अंमली पदार्थ दिल्याचे आणि बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळ्या अथवा त्यांच्या नेटवर्कमधील ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांच्या गटांने त्यांना इजा पोहोचवल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडPakistanपाकिस्तानMolestationविनयभंगPoliticsराजकारण