शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान म्हणजे ‘टेररिस्तान’, संयुक्त राष्ट्रात भारताचा जोरदार हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 06:08 IST

दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला.

न्यू यॉर्क : दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला. पाकिस्तान म्हणजे दहशतवादाची भूमी आहे. दहशतवाद्यांना ते आपले नंदनवन वा स्वर्गच वाटते. त्या ठिकाणी दहशतवादाची निर्मिती होते आणि जागतिक स्तरावर त्याची निर्यात होते, अशी जहाल टीकाही इनाम गंभीर यांनी केली.सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला. काही देशांच्या मदतीने चालणाºया अतिरेकी संघटनांवर त्यांनी प्रहार केला. देशाचे धोरण म्हणून दहशतवादाचा उपयोग करणे बंद करा, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे तसेच या संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद थांबवावी, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचे पोषण करणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचाच अंत करण्याची गरज असल्याचे स्वराज म्हणाल्या.पाकचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार वापरत इनाम गंभीर म्हणाल्या की, पाकिस्तानचे सर्व शेजारी देश त्यांचा धूर्तपणा, कपट कारस्थाने जाणून आहेत. (वृत्तसंस्था)>कोण ही नवदुर्गा?पाकला टेररिस्तान म्हणणारी या ‘नवदुर्गा’ आहेत इनाम गंभीर. त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या स्थायी सचिव आहेत. त्या दिल्लीच्या राहणाºया असून, २००५च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत.बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही पाकिस्तानवर टीका केली. त्या म्हणाल्या की याच पाकिस्तानच्या सैन्याने १९७१ मध्ये भयंकर नरसंहार घडवून आणला. त्यात आमच्या देशातील ३० लाख निर्दोष नागरिक मारले गेले. पाक सैन्याने त्यावेळच्या पाकिस्तानातील बांग्लादेशवर २५ मार्च १९७१ च्या रात्री अचानक हल्ला केला. त्यानंतर युद्ध सुरू झाले आणि १६ डिसेंबर रोजी हे युद्ध संपले.