पाकिस्ताननेचीनच्या मदतीने एक रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट प्रक्षेपित केला आहे. तो चीनमधील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून देखील प्रक्षेपित करण्यात आला. पाकिस्तानच्या अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोगाने (SUPARCO) गुरुवारी ही माहिती दिली.
"हा उपग्रह पाकिस्तान आणि चीनला CPEC वर लक्ष ठेवण्यास मदत करेल. याशिवाय, चीन आणि पाकिस्तानच्या अनेक संयुक्त प्रकल्पांवर अंतराळातून लक्ष ठेवता येईल, असं प्रवक्त्याने सांगितले. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो, तो प्रत्यक्षात भारताचा एक भाग आहे.
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
हा उपग्रह पीओकेवरही लक्ष ठेवेल आणि ही भारतासाठीही एक धोक्याची घंटा आहे. "या उपग्रहातून कृषी क्षेत्राची माहिती गोळा करता येईल. याशिवाय, पर्यावरणीय समस्यांचे विश्लेषण करण्यास देखील मदत होईल. धोरणात्मक महत्त्वाच्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवता येईल आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन देखील करता येईल", असं पाकिस्तानी एजन्सीचे म्हणणे आहे.
"हा पाकिस्तानचा दुसरा रिमोट-कंट्रोल्ड उपग्रह आहे. यापूर्वी PRSS-1 लाँच करण्यात आला होता. तो २०१८ मध्ये लाँच करण्यात आला होता. या नवीन उपग्रहामुळे पाकिस्तानचे एकूण ५ उपग्रह अंतराळ कक्षेत सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, यामुळे आम्हाला अवकाश-आधारित देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल. पाकिस्तान अंतराळ मोहिमांमध्येही पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.