शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:00 IST

Pakistan News: पाकिस्तानात सोमवारी रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होते. अनेक कैदी आधीपासूनच बॅरेकबाहेर आले होते.

सोमवारी रात्री उशिरा भूकंपानेपाकिस्ताना हादरला आहे. फार मोठे नुकसान झालेले नसले तरी पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. कराचीच्या तुरुंगातूनभूकंपाचा फायदा घेऊन तब्बल २१६ कैदी पळाले आहेत. यामुळे मालीर जिल्हा कारागृह प्रशासनाची भंबेरी उडाली असून या कैद्यांना पकडण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. 

सोमवारी रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होते. अनेक कैदी आधीपासूनच बॅरेकबाहेर आले होते. भूकंपाचे धक्के बसू लागताच तुरुंगात गोंधळ उडाला, याचा फायदा या कैद्यांनी घेण्यास सुरुवात केली. यामुळे तुरुंग कर्मचाऱ्यांवर दबाव आला आणि झटापट सुरु झाली. याचा फायदा घेत २१६ कैद्यांनी पळून जाण्यात यश मिळविले. 

कैद्यांना रोखण्यासाठी तुरुंगात गोळीबारही करण्यात आला. या झटापटीत एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर पाच अधिकारी जखमी झाले आहेत. यानंतर लगेचच पोलीस आणि पाकिस्तानी रेंजर्सनी तुरुंगाच्या आजुबाजुच्या भागाचा ताबा घेतला आहे. यावेळी सर्च ऑपरेशनमध्ये ८० कैद्यांना पकडण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

पोलिस आणि निमलष्करी दलांचा मोठा ताफा काही मिनिटांतच तुरुंगात पोहोचला आणि जवळपासच्या वस्त्या, महामार्ग आणि गावे सील करण्यात आल्याचे एसएसपी मालीर काशिफ आफताब अब्बासी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. याचबरोबर पळून गेलेल्या कैद्यांना पकडण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मशीदींच्या भोंग्यांवरून करण्यात येत आहे. 

सर्कल क्रमांक ४ आणि ५ मधील ६०० हून अधिक कैदी त्यांच्या बॅरेकबाहेर बसले होते. भूकंप सुरु झाल्यानंतर पळून जाण्याच्या मानसिकतेचे कैदी गोंधळ घालू लागले. या अफरातफरीत मोठा गोंधळ उडाला आणि तुरुंगातच पळापळ सुरु झाली. तुरुंग प्रशासनाकडे तेवढी सुरक्षा व्यवस्था नव्हती. यामुळे हे कैदी बाहेर पळून गेल्याचे, वृत्त पाकिस्तानी साम टीव्हीने दिले आहे. 

टॅग्स :EarthquakeभूकंपPakistanपाकिस्तानjailतुरुंग