शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! २० कोटी रूपये घेऊन गायब झाला व्हॅनचा ड्रायव्हर, बॅंकेत भरण्यासाठी आणली गेली होती कॅश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:02 IST

कॅश ट्रान्झॅक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चुंदरीगड रोड पाकिस्तानचा आर्थिक केंद्र आआहे.

कराचीतील एक व्यक्ती कथितपणे ती व्हॅन घेऊन फरार झाला ज्यात २० कोटी रूपयाची रक्कम होती. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, व्हॅनचा सुरक्षा गार्ड जेव्हा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी चुंदरीगड रोडवरील 'स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तान'च्या इमारतीत गेला तेव्हा सुरक्षा कंपनीत कार्यरत वाहन चालक हुसैन शाह व्हॅन घेऊन फरार झाला.

कॅश ट्रान्झॅक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चुंदरीगड रोड पाकिस्तानचा आर्थिक केंद्र आआहे. जिथे केंद्रीय  बॅंक आणि इतर बॅंका आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'हे एक असामान्य प्रकरण आहे. ही घटना नऊ ऑगस्टला भर दिवसा घडली. आम्ही सर्व बाजूंचा विचार  करून प्रकरणाची चौकशी करत आहोत. कारण अशी घटना आधी कधी घडली नाही'.

विशेष तपास अधिकारी तारिक चौधरी म्हणाले की, या केसमध्ये काही ठोस प्रगती झाली नाही आणि चालकालाही अजून अटक करण्यात आलेली नाही. तारिक म्हणाले की, 'सुरक्षा कंपनीच्या एका व्हॅनमध्ये केंद्रीय बॅंकची रक्कम नेण्यात येत होती आणि सुरक्षा गार्ड मुहम्मद सलीमनुसार तो रक्कम हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बॅंकेच्या आत गेला होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा व्हॅन तिथे नव्हती. त्याने  चालकाला फोन केला तर तो म्हणाला की, तो थोड्या वेळात परत येईल. कारण त्याला एक महत्वाचं काम आहे'.

त्यांनी सांगितलं की, गार्डने पुन्हा चालकाला फोन केला तर त्याचा फोन बंद येत होता. व्हॅन काही किलोमीटर अंतरावर सापडली आहे. पण त्यातील २० कोटी रूपयांची रक्कम गायब आहे. रकमेसोबतच व्हॅनमधून हत्यार, एक कॅमेरा आणि डीव्हीआरही गायब आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीThiefचोरRobberyचोरी