शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 22:44 IST

पाकिस्तानात बंडखोर गटाने एका एक्स्प्रेस ट्रेनला आईडीने लक्ष्य करत मोठा स्फोट घडवून आणला.

Pakistan Jaffar Express:पाकिस्तान सध्या एका मोठ्या गृहयुद्धाशी झुंजत आहे. एकीकडे लष्कराच्या हवाई हल्ल्यात ३० हून अधिक लोक ठार झाल्यानंतर खैबर पख्तूनख्वा प्रांतात आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर गट पाकिस्तानी सैन्याला सतत लक्ष्य करत आहेत. अशातच मंगळवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा-पेशावर मार्गावर धावणाऱ्या जाफर एक्सप्रेसला अपघात झाला.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मास्तुंग जिल्ह्यातील दश्त भागात जाफर एक्सप्रेसमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि ती उलटली. या अपघातामुळे घटनास्थळी घबराट पसरली आणि प्रवासी घाबरून पळून गेले. एका बलुचिस्तान बंडखोर गटाने ट्रॅकवर बॉम्बस्फोट करून ट्रेनला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. काही तासांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता.

जाफर एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरल्यामुळे किमान चार जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. पेशावरहून क्वेट्टाला जाणारी जाफर एक्स्प्रेस ही ट्रेन बलुचिस्तानमधील स्पेझंद शहराजवळून जात असताना रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणला.  बलुच रिपब्लिकन गार्ड्सने एक निवेदन जारी करून हा स्फोट घडवल्याचा दावा केला. ट्रॅकवर केलेल्या आयईडी स्फोटात अनेक पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले आणि जखमी झाल्याचे बलुच गटाने म्हटलं. बलुच रिपब्लिकन गार्ड्सचे प्रवक्ते दोस्तैन बलोच यांनी  म्हटलं की, "आज संध्याकाळी, मास्तुंगच्या दश्त भागात जाफर एक्सप्रेसला रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार आणि जखमी झाले." 

या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे अपयश देखील समोर आले आहे. कारण काही तासांपूर्वीच त्याच भागात रेल्वे ट्रॅक साफ करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर आयईडीने हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक सैनिक गंभीर जखमी झाले होते. दुसरीकडे या घटनेनंतर अपघातग्रस्त रेल्वेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आयईडी स्फोटात जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या उलटलेल्या डब्यांमधून प्रवाशांना वाचवताना दिसत आहेत. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघात