शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 23:33 IST

पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, तालिबानने भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये तणाव वाढला. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तान एकटा पडल्याचे दिसले. तालिबाननेही त्यावेळी भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. दरम्यान, आता पाकिस्तान शेजारी असणाऱ्या देशांसोबत चांगले संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे.

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता पाकिस्तानने अफगाणिस्तानशी संबंध सुधारण्याची घोषणा केली आहे. ते तालिबान सरकारशी राजनैतिक संबंध सुधारणार असल्याची घोषणा पाकिस्तानने शुक्रवारी केली. यासोबतच पाकिस्तान अफगाणिस्तानात आपला राजदूतही नियुक्त करणार आहे. 

तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले

२०२१ मध्ये जेव्हा तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हा पाकिस्तानने शांतपणे त्याचे कौतुक केले. तालिबान सरकार त्यांच्या सुरक्षेच्या चिंता दूर करेल, अशी अपेक्षा पाकिस्तानला होती. पण त्याच्या उलट घडले. तालिबान राजवटीत, पाकिस्तानी सीमेवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवाद्यांचे हल्ले अनेक पटींनी वाढले आहेत, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने तालिबानवर टीटीपी बंडखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

चीनने मध्यस्ती केली

चीनच्या मध्यस्थीने या महिन्यात बीजिंगमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा राजकीय संबंध पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मतभेद सोडवण्यात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.

यापूर्वी, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही एप्रिलमध्ये काबूलला भेट दिली होती. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानी मंत्र्यांचा हा पहिलाच अफगाणिस्तान दौरा होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत