शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:33 IST

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी

लंडन/इस्लामाबाद : पाकिस्तानने गतकाळात अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिला व त्याचा आम्हाला खूप त्रास भोगावा लागत आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुत्तो-झरदारी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. पाश्चिमात्य देशांच्या गैरकृत्यांसाठी पाकिस्तानने  साथ दिली, असे त्या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते. त्यावर बिलावल यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, पाकिस्तानचा दहशतवादी गटांशी गतकाळात संबंध होता हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आमच्या देशाला खूप त्रास सहन करावा लागला तसेच दहशतवादाचे तडाखेही बसले. आमच्या समाजाचे इस्लामीकरण, सैनिकीकरण झाले. मात्र या गोष्टींतून पाकिस्तान काही धडे शिकला. त्यानंतर आम्ही अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या. माझी आई व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पाकिस्तानाच्या इतिहासात अशा गोष्टी घडल्या असून, दुर्दैवाने तो आमच्या इतिहासाचा एक भाग आहे.

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पाकिस्तानचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, असे बिलावल भुत्तो-झरदारी यांनी यापूर्वी म्हटले होते. त्याबद्दल ते म्हणाले की, रक्तपातासाठी चिथावणीचा माझा हेतू नव्हता. सिंधू नदीचे पाणी भारताने अडवले तर ती युद्धजन्य कृती मानली जाईल, असे पाकिस्तान सरकारने म्हटले होते. युद्ध म्हटले की रक्तपात अटळ असतो. आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे. त्यासाठी भारताशी आम्ही कायम संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. (वृत्तसंस्था)

बंकरमध्येच आता भरते शाळा

जम्मू : हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाचे परिणाम आता नियंत्रण रेषेलगत (एलओसी) असलेल्या भागांतील शिक्षणावरही दिसू लागले आहेत. अनेक गावांमधील शाळांचे वर्ग आता बंकरमध्ये भरविले जात आहेत.

दुर्गम कुपवाडा जिल्हा हा सीमेलगतचा एक प्रमुख जिल्हा आहे. तिथे पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून गोळीबार सुरू ठेवला आहे. त्यामुळे तेथील सरकारी शाळेने तळमजल्यावरील वर्ग बंद केले. इयत्ता ६वी ते १०वी इयत्तेचे वर्ग शाळेच्या परिसरात असलेल्या भूमिगत बंकरची सफाई करून तिथेच भरवले जात आहेत.

२०१२ मधील पुरामुळे बंकरच्या प्रवेशद्वाराजवळ चिखल आणि माती साचली होती, परंतु आता तो परिसर स्वच्छ करण्यात आला. या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच हल्ल्याच्या वेळी काय हालचाली कराव्यात याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

जर शाळेची घंटा वाजली, तर विद्यार्थ्यांनी लगेच वर्गातून बाहेर पडून बंकरमध्ये लपावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. येथील अनेक शाळांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या मदतीला

भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पाकिस्तान वाघा सीमेवरून मायदेशात येण्याची परवानगी देणार आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे अनेक नागरिक भारतात अडकले आहेत.

भारत सरकारने निश्चित केलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर गुरुवारी ७० पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर अडकले.  भारतीय अधिकारी आमच्या नागरिकांना सीमापार करण्याची परवानगी देत असतील तर आम्ही त्यांचा स्वीकार करण्यास तयार आहोत. पाक नागरिकांसाठी वाघा सीमा खुली राहील.

‘नोकरी नको, भरपाई नको, शहीद म्हणून जाहीर करा’

हल्ल्याला दहा दिवस झाले असतानाही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी व्यथा हल्ल्यात पतीला गमावलेल्या आशन्या द्विवेदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मला कोणतीही नोकरी किंवा भरपाई नको. हल्ल्यात मरण पावलेल्या शुभम यांना शहीद म्हणून घोषित करा इतकीच माझी मागणी आहे.

आशन्या म्हणाल्या की, मी पुन्हा कधीही काश्मीरला जाणार नाही. शुभमचा फोटो आणि त्याने त्या दिवशी घातलेला शर्ट पाहात मी तासनतास खोलीतच बसते. एखाद्या टायरच्या फुटण्याचा आवाज जरी झाला, तरीही भीतीने मला कापरे भरते. राहुल गांधींनी नुकतीच आशन्या यांची भेट घेत त्यांचे "सांत्वन केले होते.

पाकिस्तानी महिलेसोबत विवाह; जवानाची  चौकशी

पाकिस्तानी नागरिक असलेल्या मीनल खान यांच्याशी सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या मुनीर खान या जवानाने विभागाची परवानगी न घेता विवाह केल्याने त्याची चौकशी होणार आहे. त्याच्या पत्नीला मंगळवारी वाघा सीमेवर पाठविण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची पाकिस्तानात होणारी रवानगी स्थगित करण्यात आली. व्हिसा संपल्यावरही भारतात वास्तव्य करून असल्याची बाब लपवण्याचा जवानावर आरोप आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत