शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:13 IST

कराची विमानतळाजवळील रहिवाशी भागात विमान कोसळलं

कराची: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमानाला अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या विमानात ९० जण असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जीवितहानीबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला झालेला अपघात अतिशय भीषण असल्याचं म्हटलं. या अपघातामधून कदाचित कोणीही वाचू शकणार नाही, अशी भीती प्राधिकरणानं व्यक्त केली. या अपघातामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विमानाचे लँडिग गियर सुरू न झाल्यानं अपघात झाल्याची माहिती काही स्थानिक माध्यमांनी दिली आहे. विमानाच्या लँडिंगच्या मिनिटभर आधी अपघात झाल्याचं पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या विमानात जवळपास ९० प्रवासी आणि कर्मचारी होते. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. यामध्ये विमानतळाशेजारील मॉडेल टाऊन परिसरातील ४-५ घरं जळून खाक झाली. या भागातील काही गाड्यांचंदेखील मोठ नुकसान झालं. सध्या अपघातस्थळी बचावकार्य सुरू झालं असून रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या अपघातात विमानामधल्या प्रवाशांसोबतच मॉडेल टाऊन परिसरातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....