आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानआंतरराष्ट्रीय एअरलाईन्सला (PIA) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पगार थकल्यामुळे एअरक्राफ्ट इंजिनिअर्सनी 'एअरवर्दीनेस क्लियरन्स' देणं पूर्णपणे थांबवल्याने एअरलाईन्सचं संपूर्ण कामकाज ठप्प झालं आहे.
सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून एकही आंतरराष्ट्रीयविमानाचं उड्डाण झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान १२ नियोजित उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. शेकडो प्रवासी इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील प्रमुख विमानतळांवर अडकले आहेत.
सोसायटी ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअर्स ऑफ पाकिस्तान (एसएईपी) ने म्हटलं आहे की, एअरलाइनचे सीईओ जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाहीत तोपर्यंत त्यांचे सदस्य कामावर परतणार नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून व्यवस्थापन त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा युनियनचा आरोप आहे.
इंजिनीअर्सनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांपासून त्यांना कोणतीही पगारवाढ मिळालेली नाही आणि आता स्पेयर पार्टची मोठी कमतरता असूनही विमानांना उड्डाण करण्याची मंजुरी देण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. "आम्ही प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार नाही" असं युनियनने म्हटलं आहे.
दरम्यान, पीआयएच्या सीईओंनी या संपाला "बेकायदेशीर" म्हटलं आहे आणि पाकिस्तान अत्यावश्यक सेवा कायदा १९५२ अंतर्गत हा संप बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, हा संप एअरलाईनच्या सुरू असलेल्या खाजगीकरण प्रक्रियेला अडथळा आणण्याच्या उद्देशाने आहे.
एअरलाईन व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की, ते लवकरच उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी इतर कॅरियर्सकडून इंजिनिअरिंग सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पीआयएचं उड्डाण वेळापत्रक सध्या पूर्णपणे विस्कळीत झालं आहे आणि सध्या तरी सामान्य स्थितीची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत.
Web Summary : PIA faces disruption as engineers halt clearances over unpaid wages. Flights grounded, passengers stranded at major airports. Union cites lack of raises and pressure to okay unsafe flights. Management deems strike illegal, seeks alternative engineering support.
Web Summary : वेतन बकाया होने पर इंजीनियरों द्वारा मंजूरी रोकने से पीआईए बाधित। उड़ानें रद्द, यात्री प्रमुख हवाई अड्डों पर फंसे। यूनियन ने वेतन वृद्धि की कमी और असुरक्षित उड़ानों को मंजूरी देने के दबाव का हवाला दिया। प्रबंधन ने हड़ताल को अवैध बताया, वैकल्पिक इंजीनियरिंग सहायता मांगी।