शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'होय, मी एक प्लेबॉय होतो...' कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिपवरुन इम्रान खानचा बाजवावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:58 IST

Imran Khan on Bajwa: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कथित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत.

Imran Khan Attacked on Qamar Javed Bajwa:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान कथित ऑडियो आणि व्हिडिओ क्लिवमुळे अडचणीत आले आहेत. यातच त्यांनी निवृत्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इम्रान खानचा आरोप आहे की, माजी लष्करप्रमुख बाजवा यांनी त्यांना गेल्या वर्षी अविश्वास प्रस्तावाद्वारे घटनात्मक पदावरून हटवण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या बैठकीत त्यांना 'प्लेबॉय' म्हटले होते. सोमवारी (2 जानेवारी) लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना पीटीआय अध्यक्षांनी त्यांच्याशी संलग्न असलेल्या 'डर्टी ऑडिओ'बद्दलही भाष्य केले.

'प्लेबॉय' कमेंटवर बाजवाला उत्तर द्यापाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांनीही आपल्या कार्यकाळात जनरल कमर जावेद बाजवा यांना मुदतवाढ दिल्याबद्दल खेद व्यक्त केला. माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्यासोबतच्या भेटीचा संदर्भ देत इम्रान खान म्हणाले, "ऑगस्ट 2022 मध्ये जनरल बाजवा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे माझ्या पक्षातील लोकांचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. त्यांनी मला आठवण करून दिली की मी 'प्लेबॉय' आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो - होय, मी एक प्लेबॉय होतो. मी कधीही देवदूत असल्याचा दावा केला नाही.''

'बाजवाने माझ्या पाठीत वार केला'गलिच्छ ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तरुणांना काय संदेश देत आहोत, असा आरोप पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला. असे ऑडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांनी अप्रत्यक्षपणे संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले. खान म्हणाले की, मला शंका आहे की बाजवा यांनी त्यांना सत्तेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्यासाठी ते अत्यंत सावधपणे दुहेरी खेळ करत असल्याचे मला समजले होते. बाजवाने माझ्या पाठीत वार केला,असा अरोपही इम्रानने केला.

बाजवाला मुदतवाढ देणे चूक होतीइम्रान पुढे म्हणाले की, जनरल बाजवाला मुदतवाढ देणे ही माझी मोठी चूक होती. मुदतवाढ मिळाल्यानंतर बाजवाने आपले खरे रंग दाखवून माझ्या सरकारविरोधात कट रचण्यास सुरुवात केली. अलीकडेच इम्रान खानच्या तीन कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्या होत्या. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला होता की, या ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत आणि त्याचप्रमाणे आगामी काळात खानच्या व्हिडिओ क्लिपही समोर येऊ शकतात.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय