शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan: राष्ट्रपतींकडून संसद बरखास्त पण त्यावर विरोधकांचा 'ताबा', पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:49 IST

Pakistan: पाकिस्तानच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकदाही कोणत्या पंतप्रधानाला आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

इस्लामाबाद: भारतासह अनेक देश रविवारी वीकेंडची सुट्टी साजरी करत आहेत, तर तिकडे पाकिस्तानच्या राजकारणात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. विरोधक इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते, पण नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान आलेच नाहीत. यादरम्यान, उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर इम्रान खान देशाला संबोधित करण्यासाठी टीव्हीवर आले आणि त्यांनी राष्ट्रपतींकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करून देशात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस केली. इम्रान खान यांच्या शिफारसीनंतर अर्ध्या तासात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली.

इम्रान खान यांची इनिंग संपुष्टातअशाप्रकारे पाकिस्तानमध्ये गेले अनेक आठवडे सुरू असलेला राजकीय गोंधळ अशा टप्प्यावर आला आहे की, जिथून पाकिस्तानला पुन्हा एकदा निवडणुकीच्या दिशेने जावे लागले आहे. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले नसले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांची इनिंग संपुष्टात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, हा विश्वास पुन्हा एकदा पक्का झाला आहे. 

विरोधकांचा संसदेवर ताबा

राष्ट्रपतींनी इम्रानची शिफारस मान्य करुन संसद बरखास्त केली आणि इम्रान यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. दुसरीकडे, विरोधी खासदार सदन सोडण्यास तयार नाहीत, त्यांनी आपला सभापती निवडला आणि संसदेचे कामकाज सुरू केले. दरम्यान, विरोधकांनी खेळी करत अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठही स्थापन केले आहे.

कलम-5 चा हवाला देत उपसभापतींनी खेळ बदललापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चा सुमारे 40 मिनिटे उशिराने सुरू झाली. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होताच इम्रान सरकारचे मंत्री चौधरी फवाद यांनी अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडली. मात्र उपसभापती कासिम सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव हा घटनेच्या कलम-5 च्या विरोधात असल्याचे सांगत तो फेटाळला. 

राष्ट्रपतींनी अर्ध्या तासात संसद बरखास्त केली

इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी अर्ध्या तासात पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बरखास्त करून नव्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. आता पुढील 90 दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 224 अंतर्गत राहतील. यासह पाकिस्तानचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे. या निर्णयानंतर नॅशनल असेंब्लीला अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. संसद भवन आणि रेड झोन निवासस्थानाभोवती पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्ससह पोलीस आणि निमलष्करी दलांचे 6,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान