शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:01 IST

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. या कारवाईचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतावर टीका करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताची स्पष्ट भूमिका

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय हिमनदी परिषदेत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी पाकिस्तानच्या आरोपांना ठाम उत्तर दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सिंधू पाणी कराराचे खरे उल्लंघन पाकिस्तानने केले आहे. सीमापार दहशतवाद पसरवून आणि अशा कारवायांना आश्रय देऊन त्यांनी करारातील 'सद्भावनेने सहकार्य' या तत्त्वांचा अवमान केला आहे.”

पाण्याचा शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळला

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर बोलताना भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना कीर्तिवर्धन सिंह म्हणाले, “सिंधू जल करार पाण्याच्या वाटपाविषयी आहे, आणि या परिषदेशी त्याचा काहीही संबंध नाही. अशा आंतरराष्ट्रीय मंचांचा गैरवापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय संस्था आणि चर्चांनाही दूषित करत आहे.”

राज्यमंत्री सिंह यांनी यावर अधिक प्रकाश टाकत सांगितले की, “जगात हवामान बदल, राजकीय घडामोडी आणि तांत्रिक प्रगतीमुळे जुने करार कालबाह्य होत आहेत. अशा परिस्थितीत सिंधू पाणी कराराचे पुनरावलोकन आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा दुसरा देश सातत्याने शेजारी देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहे, तेव्हा या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.”

दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशाशी सौम्यता शक्य नाही!

भारताने पाकिस्तानवर गंभीर आरोप करत म्हटले की, “दहशतवाद्यांना सक्रिय आश्रय देणाऱ्या देशाशी सौम्यतेने वागणे हा पर्याय नाही. सुरक्षा, विश्वास आणि द्विपक्षीय संबंध यांचा भंग केल्यास त्याचे परिणाम होणारच.”

सिंधू पाणी कराराची पार्श्वभूमी

१९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करार झाला होता. या करारानुसार, भारताला तीन पूर्वेकडील नद्यांचा (रावी, बियास, सतलज) आणि पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांचा (सिंधू, झेलम, चेनाब) उपयोग करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर