शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे ते विमान पाडण्यामागे आमचा हात नाही, पाकिस्तानचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:47 IST

भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता.

इस्लामाबाद -  भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तानने या प्रकरणी स्पष्टीकरण देत बडगाममध्ये भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानामागे आपला हात नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते  मेजर जनरल आसिफ गफुर म्हणाले की, ''भारतीय हवाई दलाचे विमान बडगाम येथे कोसळल्याचे वृत्त आहे. मात्र यामागे पाकिस्तानचा हात नाही.'' बडगाम जिल्ह्यातील कलान गावात लढाऊ विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच ऑपरेशन टीम घटनास्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्त विमानातून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही.  दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद