शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारतात सोन्याने गाठला उच्चांक; पाकिस्तानात काय आहेत 1 तोळा सोन्याचे भाव? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:56 IST

Pakistan Gold Price: भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत.

Gold Price in Pakistan : सोन्याचे दर 1 लाखांच्या पुढे जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज अखेर तो दिवस उजाडला अन् भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम(तोळा) 1 लाख रुपयांच्या पुढे गेले. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम 10,000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. दरम्यान, भारतात 1 लाखाचा टप्पा ओलांडणाऱ्या सोन्याला पाकिस्तानात काय किंमत आहे, हे जाणून घेऊ.

सोमवारी जीएसटीपूर्वी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 97,200 रुपयांवर होता, परंतु 3 टक्के जीएसटी जोडल्यानंतर किरकोळ किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे गेली. याचाच अर्थ आता तुम्हाला दागिने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. 

पाकिस्तानात सोन्याला काय भाव?रिपोर्ट्सनुसार, 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 324940 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे पाकिस्तानातील सोन्याचे दर 98,509 रुपयांवर पोहोचले आहेत.

पाकिस्तानात सोन्याचे भाव का वाढताहेत?मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील सोन्याच्या व्यापाराशी संबंधित लोक आणि विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, देशातील सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आहे. ही वाढ अमेरिका आणि चीनमधील तीव्र होत चाललेल्या व्यापार युद्धाचा परिणाम असल्याचे मत पाकिस्तानी तज्ञांचे आहे.

टॅग्स :GoldसोनंPakistanपाकिस्तानIndiaभारतInvestmentगुंतवणूक