शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 13:21 IST

पाकिस्तान सरकारने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि बिगोविषयी समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या आहेत.

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने आपल्या ‘सदाबहार मित्र’ असलेल्या चीनला मोठा धक्का दिला आहे. भारतानंतर आता पाकिस्ताननेचीनच्या बिगो अ‍ॅपवरही बंदी घातली असून, टिकटॉकलाही अंतिम इशारा दिला आहे. पाकिस्ताननं अश्लील व्हिडीओ आणि अनैतिक फोटो दाखवल्याप्रकरणी ही बंदी घातली आहे. यापूर्वी पाकिस्तानने पबजी या गेमिंग अ‍ॅपवरही बंदी घातली होती. गेल्या आठवड्यातच लाहोर उच्च न्यायालयात टिकटॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. हे अ‍ॅप आधुनिक काळात मोठं दुष्कर्म पसरवत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. ते म्हणाले की, सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि रेटिंगच्या मोहात  टिकटॉक अश्लीलतेचे प्रमुख स्त्रोत बनले आहे. पाकिस्तान सरकारने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि बिगोविषयी समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या आहेत.या दोन्ही अ‍ॅप्सकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही, असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. यानंतर सरकारने बिगो ऍपवर बंदी घातली आणि टिकटॉकला अंतिम इशारा दिला आहे. यापूर्वी इम्रान खान सरकारने ऑनलाइन मल्टिप्लेअर गेम पबजीवर बंदी आणण्याची घोषणा केली होती. हा खेळ इस्लामविरोधी असून, या खेळानं तरुणांना व्यसन लागल्याचे सरकारने म्हटले होते.या खेळामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही सरकारने म्हटले आहे. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील पबजी खेळणाऱ्या तरुणांना बर्‍याच मानसिक दबावाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तरुणांमध्ये आत्महत्या करण्याच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. या सरकारी एजन्सीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले की, पबजी गेममधील काही दृश्ये इस्लामविरोधी आहेत. ज्यांना पाकिस्तानमध्ये परवानगी नाही.

हेही वाचा

माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन