शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
5
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
6
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
7
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
9
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
10
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
11
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
13
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
14
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
15
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
16
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
17
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
18
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
19
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
20
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:06 IST

Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan Floods: सध्या उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जम्मू-काश्मी, उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये अनेक नद्यांना महापूर आला आहे. भारतासह पाकिस्तानातील पंजाब, सियालकोटमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अडीच लाख लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे १,४३२ गावे पुरामुळे बाधित आहेत. पिके उद्ध्वस्त झाली असून, व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, अशा कठीण काळातही पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकतोय.

पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक विचित्र विधान केले. त्यांच्या मते, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मृतदेह, गुरे आणि कचऱ्याचा ढीग पाकिस्तानात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा येत आहे. आसिफ पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खाली आहे. जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियमित पूर येतो. मात्र, आसिफ यांनी हे देखील कबूल केले की नद्यांमध्ये पाणी सोडण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला दोनदा माहिती दिली होती.

सोशल मीडियावर ट्रोलख्वाजा आसिफ यांचे हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी त्यांच्यावर टीका केली की, सरकार त्यांच्या तयारी आणि पायाभूत सुविधांच्या अपयशापासून लक्ष हटविण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मंत्र्याने अजब दावा केला आहे. 

पाकिस्तानात ऐतिहासिक पूरपाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या मते, ३८ वर्षांत प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सैन्य आणि मदत कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरriverनदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला