शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:56 IST

इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले.

इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या तणावामध्ये आता पाकिस्तानने मोठे विधान केले आहे. इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. यावेळी त्यांनी इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे असा आग्रह धरला.

परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले, "इराणबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. आम्ही इराणला पूर्ण नैतिक पाठिंबा देतो. आम्ही इराणवरील आक्रमणाचा तीव्र निषेध करतो. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे." 

"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत

शफकत अली खान म्हणाले, इराणच्या सीमेवरील पाकिस्तानमध्ये इराणी निर्वासितांना आश्रय देण्याची तेहरानकडून कोणतीही विनंती आलेली नाही. २१ मुस्लिम देशांनी संयुक्त निवेदनात इराणवरील इस्रायली आक्रमणाला नकार दिला आहे आणि इस्रायलची कृती आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या विरुद्ध असल्याचे वर्णन केले आहे.

इराणची परिस्थिती पाकिस्तानसाठी चिंतेचे विषय

"इराणची परिस्थिती पाकिस्तानसाठी चिंतेचे विषय आहे. यावेळी शफकत अली खान यांनी इस्त्रायलला हल्ले थांबवण्याची विनंती केली. इराण-इस्रायल संघर्षावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यास पाकिस्तान पाठिंबा देतो, असंही ते म्हणाले.

पाकिस्तान चिंतेत

जर इस्रायलशी संघर्षामुळे इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर इराणच्या सीमेवरील फुटीरतावादी आणि जिहादी त्याचा फायदा घेऊ शकतात, ही भीती पाकिस्तानला भीती आहे. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत ही चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या चिंतेचे आणखी एक कारण म्हणजे इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेला हल्ला चुकीचा आदर्श ठेवू शकतो.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराणIsraelइस्रायल