शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 19:40 IST

निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे.

इस्लामाबाद - निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. उपखंडामध्ये समृद्धीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती होणे आवश्यक असल्याचे सांगत भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर संवाद साधताना इम्रान खान म्हणाले. जर आम्हाला या क्षेत्रातून गरिबी दूर करायची असेल, तर आम्हाला भारत आणि पाकिस्तामधील व्यापार वाढवला पाहिजे." यावेळी कायदे आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान आपल्याला बनवायचा आहे, असेही इम्रान यांनी सांगितले. यावेळी इतर पाकिस्तानी नेत्यांप्रमाणेच इम्रान यांनीही काश्मीर राग आळवला. "भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. गेली 30 वर्षे काश्मिरी जनतेने बरेच काही सहन केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. यावेळी बलुचिस्तानमध्ये जे काही होत आहे, त्यामागे भारताचा हात असल्याचे आम्हाला वाटते, असा आरोपही त्याने केला. मात्र या आरोप-प्रत्यारोपांना मागे टाकून आपण पुढे गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावले पुढे येऊ असेही ते म्हणाले.  

 दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमांनी आपल्याविषयी केलेल्या नकारात्मक प्रचाराबाबत इम्रान खान यांनी निराशा व्यक्त केली. भारतातील मीडियाने मला बॉलिवू़डमधील व्हिलनप्रमाणे दाखवले.  मात्र मी असा पाकिस्तानी आहे. जो क्रिकेटमुळे संपूर्ण भारत फिरलो आहे.  

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक