शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Election 2018: पीटीआय सर्वात मोठा पक्ष; इम्रान खान पंतप्रधान होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 07:54 IST

इम्रान खान यांचा पक्ष बहुमतापासून दूर

इस्लामाबाद: पाकिस्तानात काल सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. यानंतर रात्रीपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यामध्ये सुरुवातीपासूनच इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षानं आघाडी घेतली आहे. माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. पाकिस्तानात काल 272 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला 119 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएमएल 56 जागांवर आघाडीवर आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानावर आहे. पीपीपी 34 जागांवर पुढे आहे. याशिवाय 58 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईददेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. मात्र त्याच्या मिल्ली मुस्लिम लीगला एकाही जागेवर आघाडी मिळालेला नाही.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पीटीआयनं आघाडी घेतली. यानंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल पक्षाकडून निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. नवाज शरीफ यांचा लहान भाऊ शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले. पाकिस्तानात आता झालेली निवडणूक ही इतिहासातील सर्वात अप्रामाणिकपणे लढवण्यात आलेली निवडणूक असल्याचं शरीफ म्हणाले. आम्ही या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. आम्हाला ते मान्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. 'इम्रान खान यांनी गैरमार्गाचा वापर करुन आघाडी घेतली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. मतमोजणीत मोठा घोटाळा करण्यात आला आहे,' असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकNawaz Sharifनवाज शरीफISIआयएसआय