शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 22:20 IST

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे.

Pakistan Election: गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धूम सुरू आहे. काल रात्र आणि आज दिवसभरापासून सुरू असलेली मतमोजणी अंतिम टप्प्यात असून इम्रान खान यांच्या पक्षासोबतच नवाझ शरीफ यांनीही आपल्या पक्षाच्या विजयाचे मोठे दावे केले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनी सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. 

मतमोजणीदरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यामुळे बहुतांश उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता पाकिस्तानचे भविष्य अपक्षांच्या हाती असणार आहे.

अपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्ननवाझ शरीफ यांनी शुक्रवारी लाहोरमध्ये समर्थकांना संबोधित करताना म्हटले की, आम्ही सर्व पक्ष जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. देशात नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही. आम्ही आमचे शेजारी आणि जगातील इतर देशांशी संबंध सुधारू, असंही ते यावेळी म्हणाले.

शेहबाज शरीफ यांच्यावर जबाबदारी

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी चर्चा करत आहोत. मी शेहबाज शरीफ यांना आसिफ झरदारी, मौलाना फजल उर रहमान आणि एमक्यूएम नेत्यांना सरकार स्थापन करण्यासाठी भेटण्यास सांगितले आहे. पाकिस्तानला किमान 10 वर्षे स्थिरतेची गरज आहे. जे लोक संघर्षाच्या मनस्थितीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणतेही युद्ध नको आहे. पाकिस्तान हे सहन करू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र बसून प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पाकिस्तानला 21 व्या शतकात नेले पाहिजे. ही फक्त माझी किंवा इशाक दार यांची जबाबदारी नाही. हा सगळ्यांचा पाकिस्तान आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केले तरच पाकिस्तान या संकटातून बाहेर पडू शकेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूकInternationalआंतरराष्ट्रीयNawaz Sharifनवाज शरीफImran Khanइम्रान खान