शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 20:53 IST

पाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवरील कुरापती वाढत चालल्या आहेत. भारताच्या अनेक सीमावर्ती भागात पाककडून काही ना काही कुरघोड्या सुरूच असतात. पाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्यानं सिंध प्रांतातील हैदराबाद भागातल्या भोलारी येथे एक अत्याधुनिक हवाईतळ विकसित केलं आहे.या क्षेत्रात पाकिस्तानच्या हवाई दलानं चीनकडून प्राप्त केलेली जेएफ-17 ही लढाऊ विमानं तैनात केली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातल्या सिंधमधलं हे हवाई क्षेत्र आधीपासूनच अस्तित्वात होतं. परंतु हल्लीच त्याचा लढाऊ विमानांच्या सरावासाठी वापर करण्यात येत आहे. पाकिस्तान स्वतःच्या पूर्व भागात भारतीय हवाईदलाशी मुकाबला करण्यासाठी मोठ्या संख्यानं चीन निर्मित जेएफ-17 विमानं तैनात करत आहे. पाकिस्तानच्या हैदराबादमधील तळावर पाकिस्तानी मरिन एसएसजी कमांडोंनी स्वतःचा तळ तयार केला आहे. त्या तळावरून एसएसजी कमांडोंकडून लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांना समुद्रीमार्गे हल्ला करण्याची ट्रेनिंग दिली जाते. पाकिस्तानच्या या कुरापती लक्षात घेता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी गुजरातमधल्या सौराष्ट्रमध्ये  एक नवीन हवाईतळ विकसित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.भारताच्या या हवाईतळावरून पाकिस्तानकडून होणा-या संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देता येणार आहे. परंतु याच्या निर्माणासाठी तीन ते चार वर्षं लागण्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रकरणात निर्णय घेणा-या मंत्रिमंडळ समितीनं यंदाच गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये नवीन हवाईतळ बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलानं गेल्या वर्षीच 16 नवी जेएफ-17 थंडर विमानं हवाई दलात समाविष्ट केली होती. या लढाऊ विमानांना पाकिस्ताननं चीनच्या मदतीनं विकसित केलं आहे. पाकिस्तानकडे पहिल्यांदा 70हून अधिक जेएफ-17 थंडर विमानं होती. जेएफ-17 लढाऊ विमानं ही भारतातल्या लढाऊ विमानं तेजसच्याच तोडीची आहेत. त्यामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfighter jetलढाऊ विमानGujaratगुजरातDefenceसंरक्षण विभाग