शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कोहिनूर हिऱ्यावर पाकचा पुन्हा दावा, हिरा परत करण्याची ब्रिटनकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:55 IST

अनेक वर्षापासून भारताची शान असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला दावा केला आहे. गुरुवारी पाकिस्तानीचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ब्रिटनला कोहिनूर हिरा पाकिस्तानला परत करावा अशी मागणी केली आहे

नवी दिल्ली - अनेक वर्षापासून भारताची शान असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला दावा केला आहे. गुरुवारी पाकिस्तानीचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ब्रिटनला कोहिनूर हिरा पाकिस्तानला परत करावा अशी मागणी केली आहे. याआधीही भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण यांनी कोहिनूर हिऱ्यावर दावा केला आहे. 105 कॅरेटचा हा कोहिनूर हिरा गेल्या दिडशेहून अधिक वर्षापासून ब्रिटीश राजेशाही घराण्याकडे आहे. 

फवाद चौधरी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडावरही भाष्य करत बिटीशांनी पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेशाची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी केली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना इंग्लंडच्या इतिहासातील काळा डाग आहे असंही फवाद यांनी सांगितले. 

105 कॅरेट वजनाचा व सुमारे 200 दशलक्ष डॉलर किमतीचा कोहिनूर एकेकाळी जगातील सर्वांत मोठा हिरा मानला जात असे. भारतातून ब्रिटनला नेल्यावर हा हिरा ब्रिटनच्या शाही मुकुटात बसविला गेला. महाराणी व्हिक्टोरिया यांनी राज्याभिषेकाच्या वेळी कोहिनूर हिरा बसविलेला तो राजमुकुट परिधान केला. सध्या हा हिरा लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

कोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या. सध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता मात्र त्यावरही ठोस उत्तर आलं नाही.

ब्रिटनने केला ठाम विरोधभारत सरकारने कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत आणावा ही मागणी फार जुनी आहे. अनेकांनी त्याची सांगड राष्ट्रीय अस्मितेशीही घातली. कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी भारत करु शकत नाही त्यामुळे ब्रिटनने तो हिरा परत करण्यास ठाम नकार दिला आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतPakistanपाकिस्तान