शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 7:50 AM

यावेळी इम्रान खानला विचारण्यात आले की, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये यूएस नेवी सील्सच्या जवानांकडून मारण्यात आले. या घटनेची पाकिस्तान सरकारने चौकशी का केली नाही?

न्यूयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाला पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिल्याचं कबूल केलं आहे. ओसामा बिन लादेन याच्या अल कायदा संघटनेने अमेरिकेत 9/11 सारखा भयानक दहशतवादी हल्ला केला होता. अमेरिकी थिंक टँक काऊन्सिल ऑन रिलेंशन्स(सीएफआर) मध्ये इम्रान खान यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. 

यावेळी इम्रान खानने सांगितले की, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता. त्यापूर्वी अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयने ट्रेनिंग दिलं होतं. मात्र पाकिस्तानी सरकारने 9/11 सारख्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर अशा दहशतवादी संघटनांबाबत आपली रणनीती बदलली. मात्र पाकिस्तान आर्मीने त्यांची भूमिका बदलली नाही. 

यावेळी इम्रान खानला विचारण्यात आले की, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये यूएस नेवी सील्सच्या जवानांकडून मारण्यात आले. या घटनेची पाकिस्तान सरकारने चौकशी का केली नाही? त्यावर इम्रान खान म्हणाले की, आम्ही या घटनेची चौकशी केली. पाकिस्तान आर्मी, आयएसआयने 9/11 च्या पूर्वी अल कायदाला ट्रेनिंग दिलं होतं. त्याचे धागेदोरे आमच्याशी जोडले गेले. या घटनेनंतर सरकारने आपली नीती बदलली मात्र पाकिस्तान आर्मीतील काही अधिकारी यासाठी सहमत झाले नाहीत. अलकायदा आणि त्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याबाबत पाकिस्तानने गेल्या 3 महिन्यात अनेक खुलासे केले आहेत. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात कुठे वास्तव्यात होता याची माहिती त्यांना होती. याबाबत पाकमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सीआयएला माहिती दिली होती. त्याच माहितीच्या आधारे अमेरिकेने त्याला शोधून मारलं. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 2 मे 2011 मध्ये मध्यरात्री सीक्रेट ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून मारलं होतं. 

आयएसआयने जगभरातील मुस्लिमांना एकत्र आणून दहशतवादी बनविलेइम्रान खान यांनी असंही सांगितले की, जगातील नेत्यांना हे माहित नाही की पाकिस्तानात कट्टरता किती आहे. पाकिस्तानने 1980 मध्ये अमेरिकेच्या मदतीने सोवियत संघाच्या विरोधात जिहादचा नारा दिला होता. अमेरिकेच्या मदतीने ISI ने जगातील मुस्लिम देशातील दहशतवाद्यांना एकत्र आणून ट्रेनिंग दिलं होतं. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षत रॉनल्ड रिगन होते. 

तालिबानसोबत चर्चा थांबविण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर इम्रान खान म्हणाले की, अफगाणिस्तानातील समस्येचं निरसन सैन्याने कधी होणार नाही. 2008 मध्ये ओबामा असतानाही आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली होती मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानमध्ये लाखो अफगाणी शरण आलेले आहेत. आज तालिबानलादेखील माहित आहे की, ते एकटे अफगाणिस्तानावर नियंत्रण ठेवू शकत नाही.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाterroristदहशतवादीOsama Bin Ladenओसामा बिन लादेन