पाकिस्तानमध्ये एका लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हा अपघात झाला. यामध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांसह पाच सैनिकांचा मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटली आहे. पायलट-इन-कमांड मेजर आतिफ, सह-पायलट मेजर फैसल, फ्लाइट इंजिनिअर नायब सुबेदार मकबूल, क्रू चीफ हवालदार जहांगीर आणि क्रू चीफ नाईक आमिर अशी मृतांची नावे आहेत.
पाकिस्तानमध्ये लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर कोसळले
याबाबत पाकिस्तान लष्कराने एक निवेदन जारी केले. नियमित प्रशिक्षण घेत असलेल्या MI-17 हेलिकॉप्टरने तांत्रिक बिघाडानंतर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान त्याला अपघात झाला. दियामारमधील ठाकदास छावणीपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या हुदोर गावाजवळ पहाटे १ वाजता हा अपघात झाला.
यापूर्वी, गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्ते फैजउल्ला फारूख यांनी सांगितले होते की, "आमचे एक हेलिकॉप्टर" डायमर जिल्ह्यातील चिलास भागात कोसळले, यामध्ये पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे होते आणि मृतांमध्ये प्रादेशिक सरकारचेही समावेश होता.