शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पाकिस्तान पुन्हा लष्करी राजवटीच्या दिशेने?; माजी राजदूत म्हणतात, मार्शल लॉची घोषणाच बाकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 16:59 IST

वाजिद आता पत्रकारितेत आले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “महामारी रोकण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे लष्कर अत्यंत नाखूश आहे. यामुळेच प्रशासनाच्या अनेक मोठ्या पदांवर 12हून अधिक लेफ्टनंट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती एक तर करण्यात आली आहे अथवा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात आतापर्यंत येथे तब्बल 1 लाख 42 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. महत्वाच्या प्रशासकीय पदांवर लेफ्टनंट जनरल.इम्रान डब्ल्यूएचओचेही ऐकन नाहीत.

इस्लामाबाद :पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत येथे तब्बल 1 लाख 42 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 2 हजार 663 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इम्रान खान सरकार महामारीला आळा घालण्यात अयशस्वी ठरले आहे. देशाचे माजी डिप्लोमॅट वाजिद शम्स उल हसन यांच्या मते, सरकारच्या कामावर लष्कर नाखूश आहे. अनेक मोठ-मोठ्या पदांवर लष्करातील मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशात आता केवळ मार्शल लॉ अर्थात लष्कर शाहीची औपचारिक घोषणाच शिल्लक राहिली आहे. 

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

प्रशासकीय पदांवर लेफ्टनंट जनरल -वाजिद आता पत्रकारितेत आले आहेत. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “महामारी रोकण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे लष्कर अत्यंत नाखूश आहे. यामुळेच प्रशासनाच्या अनेक मोठ्या पदांवर 12हून अधिक लेफ्टनंट जनरल रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती एक तर करण्यात आली आहे अथवा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप औपचारिकपणे मार्शल लॉची घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारी एअरलाईन्स पीआयए, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सारख्या सर्वात मोठ्या संस्थांचे प्रमुख लष्करातील अधिकारी आहेत. हे सर्व केवळ दोन महिन्यांतच घडले आहे.”

चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

इम्रान यांना काहीच माहीत नाही -वाजिद म्हणाले, पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना महामारीचा सामना कसा करावा? यासंदर्भात काहीही माहिती नाही. ते म्हणतात,“सिंध प्रांतातील सरकारने लॉकडाउनची मागणी केली. इम्रान यांनी त्याला विरोध केला. यानंतर तेथील परिस्थिती बिघडल्यानतंर ते स्मार्ट लॉकडाउनच्या गप्पा करू लागले. सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास तीन हजार जाणांचा मृत्यू झाला. तर जवळपास एक लाख 30 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

इम्रान डब्ल्यूएचओचेही ऐकन नाहीत -डब्ल्यूएचओने इशारा दिला होता, की पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरू शकतो. यामुळे कडक लॉकडाउन करणे आवश्यक आहे. मात्र, इम्रान खान सांगतात, की देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लॉकडाउन वाढवल्यास लोक उपाशी मरतील. ते देशातील डॉक्टरांचेही ऐकत नाहीत, असेही वाजिद म्हणाले.

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

असं चाललंय सरकार -वाजिद म्हणतात, इम्रान सरकार अनेक छोट्या पक्षांना सोबत घेऊन सुरू आहे. हे सर्व पक्ष खरे तर लष्कराच्या इशाऱ्यावर चालतात. पाकिस्तानात सर्वात शक्तीशाली कुणी असेल, तर ते लष्कर आहे. खरे तर, येथे लष्कराची भूमिका नवी नाही. पाकिस्तानात पहिल्यापासूनच हेच चालत आले आहे. आधीची सरकारंही, अशीच चालली आहेत. 

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

पाकिस्तानातील राष्ट्रपती बनलेले लष्करशहा -- अयूब खान यांचा कार्यकाळ - 1958-69- याह्ना खान यांचा कार्यकाळ - 1969-71- जिया उल हक यांचा कार्यकाळ - 1977-88- परवेझ मुशर्रफ यांचा काळ - 2001-08

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSoldierसैनिकImran Khanइम्रान खान