शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान-अफगाण सीमावाद पेटला! बलुचिस्तान, सिंधमध्येही अशांतता; चेकपोस्टवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:23 IST

उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान-सिंध प्रांतात स्वातंत्र्य लढा पेटत चालला असताना अफगाणिस्तानशीही आता सीमावाद पेटला आहे. अफगाणच्या हेलमंद प्रांतात चगई जिल्ह्यालगत सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सशस्त्र संघर्ष शनिवारी अधिकच पेटला. तालिबानने या भागांत पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ले केले. उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

दरम्यान, अफगाण सीमेलगतच्या गावांत सुमारे अडीच लाख लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश तालिबानी सैनिकांनी दिले आहे. एकीकडे तालिबानने आव्हान दिले असताना बलुचिस्तान लिबिरेशन आर्मीने या प्रांतात स्वातंत्र्यलढा तीव्र करीत तालिबानला मदत करणे सुरू केले आहे. यामुळे पाकिस्तानी लष्कराची तीन आघाड्यांवर लढताना चांगलीच कोंडी झाली आहे. अफगाणिस्तानलगत काही चौक्या सोडून पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी पळ काढल्याचे अफगाण सूत्रांनी म्हटले आहे.

सिंधमध्ये नेत्यांचा पाकवर आरोप

या प्रांतात सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी लष्करानेच पहेलगाम हल्ला केल्याचा दावा सिंधमधील बंडखोर नेत्यांनी जाहीरपणे केला. पाक लष्करप्रमुख बलुचिस्तानात जवानांसमोर भाषण देत असताना सोराब शहरावर बलएलएने ताब्यात घेतले. बलुचिस्तानात बीएलएच्या कारवाईत सहायक आयुक्ताचा मृत्यू. बीएलएने क्वेट्टा-कराची महामार्गावर वाहतुकीवर निर्बंध कडक केले. 

बलुचिस्तान पेटले, सोराब शहरावर बंडखोरांचा ताबा

बलुची लिबिरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराला चकवा देत सोराब शहरावर पूर्ण ताबा मिळवला असून, या भागातील सर्व बँका, पोलिस ठाणी आणि सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवल्याचा दावा बीएलएने शनिवारी केला. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलूच यांनी माध्यमांना माहिती देताना सोराब शहरावर पूर्ण नियंत्रण मिळविल्याचे म्हटले आहे.

पाकच्या पंजाबमध्ये ३७ दहशतवादी अटकेत

लाहोर: पंजाबमध्ये सुरक्षा यंत्रणांनी ३४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी ‘तहरिक-ए-तालिबान’ या संघटनेचे असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने म्हटले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटके व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान