पाकिस्तानात २८ वऱ्हाडीसह पुरात गेले वाहून!
By Admin | Updated: July 31, 2016 19:54 IST2016-07-31T19:54:19+5:302016-07-31T19:54:19+5:30
उत्तरपश्चिम पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेले वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे १८ मुलांसह २८ जण मरण पावले.

पाकिस्तानात २८ वऱ्हाडीसह पुरात गेले वाहून!
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. ३१ : उत्तरपश्चिम पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेले वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे १८ मुलांसह २८ जण मरण पावले. तबाई भागात ही दुर्घटना शनिवारी घडली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मृतांत आठ महिला आणि दोन पुरूषही आहेत. हे वाहन बारा येथून बाझार झखाखेल येथे निघाले होते, असे लाईन अधिकारी सुभेदार हिकमत खान अफ्रिदी यांनी सांगितले.