शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Video : पाकच्या ड्रायव्हरविना 117 प्रवाशांसह भारतात पोहोचली 'समझोता एक्सप्रेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:07 IST

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान याांच्यातील संबंध दुरावले असल्याने समझोता एक्सप्रेसचा पाकिस्तानकडून थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी सुरु असलेल्या समझोता एक्सप्रेसला पाकिस्तानने थांबविले होते. अट्टारी येथून या ट्रेनला पुढे नेण्यासाठी भारताने त्यांचा ड्रायव्हर पाठवावा, अशी निरोप पाकिस्तानने दिला होता. या रेल्वेत एकूण 117 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 76 भारतीय आणि 41 पाकिस्तानी नागरिक होते. अखेर, समझोता एक्सप्रेस अट्टारी रेल्वे स्थानकावर पोहोचली.  

इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे, अखेर भारताने ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक पाठवून समझोता एक्सप्रेस भारतात आणली. दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी समझोता एक्सप्रेसची सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच, ज्या नागरिकांनी तिकीट खरेदी केले आहे, त्यांनी विभागीय रेल्वे कार्यालयातून आपले पैसे परत घेऊन जावे, असेही म्हटले आहे. यापुढे केवळ ईदच्या सणालाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वेच्या डब्ब्यांचा वापर करण्यात येणार आहे. 

22 जुलै 1976 साली समझोता एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.  यापूर्वी बालाकोट येथील हल्ल्यानंतर सीमारेषेवरील तणावामुळे 26 फेब्रुवारी रोजी ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, वातावरण पूर्वव्रत झाल्यानंतर सेवा सुरू करण्यात आली होती. या रेल्वेगाडीत 6 स्लीपर कोच आणि एक एसी 3 टियर कोच आहे. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कलम 370 आणि 35 ए हटविल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.  

पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर, आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारतPakistanपाकिस्तानRailway Passengerरेल्वे प्रवासी