पाक : लाहोरमध्ये स्फोट, ५२ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: March 27, 2016 21:35 IST2016-03-27T21:21:33+5:302016-03-27T21:35:57+5:30

लाहोरमधील गुलशन-ए-इक्बाल पार्कामध्ये स्फोट होऊन ५२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Pak: 52 killed in Lahore blast, 52 deaths | पाक : लाहोरमध्ये स्फोट, ५२ जणांचा मृत्यू

पाक : लाहोरमध्ये स्फोट, ५२ जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २७ - लाहोरमधील गुलशन-ए-इक्बाल पार्कामध्ये स्फोट होऊन ५२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

येथील गुलशन-ए-इक्बाल पार्कामधून बाहेर जाण्याच्या गेटजवळ हा स्फोट झाला. स्फोट झाला त्याठिकाणाहून काही अंतरावर चिल्ड्रन्स स्विंग्ज सुद्धा आहे. या पार्कमध्ये रविवार असल्याने मोठ्याप्रमाणात गर्दी होती. या स्फोटात आत्तापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.

तसेच, या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

Web Title: Pak: 52 killed in Lahore blast, 52 deaths