आर्टवर्क म्हणून साधे कागद देऊन चित्रकाराने उकळले ६२ लाख, आता रक्कम परत देण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:05 PM2021-09-29T20:05:28+5:302021-09-29T20:05:28+5:30

Crime News: एका आर्टिस्टने आर्टवर्कसाठी ६२ लाख रुपये घेतले. मात्र आर्टवर्कच्या नावावर एक साधा कागद चिकटवला. या आर्टिस्टने कोरा कॅनव्हास हेच आर्ट असल्याचे सांगितले.

The painter take Rs 62 lakh by giving a simple piece of paper as artwork, now he refuses to return the money | आर्टवर्क म्हणून साधे कागद देऊन चित्रकाराने उकळले ६२ लाख, आता रक्कम परत देण्यास दिला नकार

आर्टवर्क म्हणून साधे कागद देऊन चित्रकाराने उकळले ६२ लाख, आता रक्कम परत देण्यास दिला नकार

Next

कोपनहेगन (डेन्मार्क) - एका आर्टिस्टने आर्टवर्कसाठी ६२ लाख रुपये घेतले. मात्र आर्टवर्कच्या नावावर एक साधा कागद चिकटवला. या आर्टिस्टने कोरा कॅनव्हास हेच आर्ट असल्याचे सांगितले. तसेच पैसे घ्या आणि पळून जा असे या चित्राला टायटल दिले. ही अजब घटना डेन्मार्कमध्ये घडली आहे. ब्लूमबर्गने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार चित्रकाराने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. (The painter take Rs 62 lakh by giving a simple piece of paper as artwork, now he refuses to return the money)

डेन्मार्कमधील कलाकार जेन्स हेनिंगला kunsten Museum of Modern Art ने ६२ लाख रुपये दिले होते. जेन्स हेनिंग यांना ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कमधील नागरिकांच्या सरासरी उत्पनावर चित्र काढायचे होते. संग्रहालयाचे डायरेक्टर lasse Amdesson यांनी सांगितले की, जेन्स हेनिंग यांना चित्रासाठीचा मोबदला वेगळा देण्यात आला होता. तसेच ६२ लाख रुपये हे चित्र प्रदर्शित करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच प्रदर्शन संपल्यानंतर त्यांनी हे पैसे परत करणे अपेक्षित होते.

चित्रकारासोबत झालेल्या या करारामध्ये आर्टवर्कमध्ये अतिरिक्त काम केल्यास ५ लाख रुपये अजून दिले जातील असे सांगण्यात आले होते. म्युझियमच्या डायरेक्टरनी सांगितले की, जेन्स हेनिंग वैचारिक आणि हास्यआर्टसाठी प्रसिद्ध आहेत. म्युझियम डायरेक्टरच्या म्हणण्यानुसार जेन्स हेनिंग यांनी आतापर्यंत काँट्रॅक्टचे उल्लंघन केलेले नाही. कारण हे पैसे त्यांना १६ जानेवारी २०२२ पर्यंत परत करायचे आहेत. मात्र ते हे पैसे घेऊन गेले कुठे याबाबत म्युझियममधील कर्मचारी हैराण आहेत.

ब्लँक कॅनव्हास असलेल्या आर्टबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी सांगितले की, सॅलरी आणि कामाच्या मूल्यामधील नाते या आर्टच्या माध्यमातून समजता येऊ शकते. तर एका रिपोर्टमध्ये सांगितले की, जेन्स हेनिंग यांनी पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. आता प्रदर्शन संपल्यावर  पोलिसांकडे तक्रार करावी की नाही, याबाबत म्युझियम विचार करत आहे. 

Web Title: The painter take Rs 62 lakh by giving a simple piece of paper as artwork, now he refuses to return the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.