शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:39 IST

Pahalgam Terror Attack: अमेरिकेत गेलेल्या लष्करप्रमुख असीम मुनीरची पाकिस्तानी नागरिकांनीच काढली इज्जत.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पाच दिवसांसाठी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहे. अमेरिकेत पोहचताच मुनीरला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी मुनीरला प्रचंड विरोध दर्शवला. यावेळी त्यांनी मुनीरसमोर 'पाकिस्तानी नागरिकांचा खुनी', 'लाज वाटू दे', 'हुकूमशहा', अशाप्रकारच्या घोषणा दिल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१५ जून २०२५) पाच दिवसांच्या अधिकृत अमेरिका दौऱ्यावर पोहोचलेल्या असीम मुनीरसाठी अतिशय लाजिरवाणी परिस्थिती ओढवली. त्याच्याच देशातील लोकांनी रस्त्यावर उतरुन उघडपणे मुनीरचा विरोध केला आणि त्याला हुकूमशहा, भित्रा म्हटले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. यामध्ये अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी नागरिक असीम मुनीरच्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. 

व्हिडिओमध्ये दिसते की, हॉटेलबाहेर एक कार थांबते अन् असीम मुनीर हॉटेलमधून बाहेर पडून कारमध्ये बसतो, तेव्हा त्याला पाहताच जमाव आरडाओरड सुरू करतो. यावेळी निदर्शकांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले.

'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जमाव 'असीम मुनीर तू कायर आहेस', 'तुला लाज वाटते का? खुनी', 'हुकूमशहा' आणि 'इस्लामाबादचा खून करणारा' असे म्हणताना दिसून येतात. आणखी एका व्हिडिओमध्ये मुनीरच्या हॉटेलजवळ इलेक्ट्रॉनिक होर्डिंग लावण्यात आल्याचे दिसून आले, ज्यावर मुनीरच्या विरोधात घोषणा लिहिलेल्या आहेत. त्यावर, 'असीम मुनीर खुनी' आणि 'जेव्हा बंदुका बोलतात, लोकशाही संपते', अशाप्रकारचा मजकुर लिहिलेला दिसतो.

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनमधील वृत्तानुसार, असीम मुनीर अमेरिकेशी लष्करी आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने गेला आहे. तर, व्हिडिओबद्दल दावा करण्यात आला की, असीम मुनीरच्या विरोधात घोषणा देणारे हे लोक माजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे (पीटीआय) समर्थक आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका