शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:12 IST

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर येथे झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. ही शिष्टमंडळे त्या-त्या देशात जाऊन पाकिस्तानची पोलखोल करण्यासोबतच ऑपरेशन सिंदूरसह भारताच्या पाकिस्तानविरोधातील कारवाईची माहिती देतील. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी(शप) नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुस्लीमबहुल कतारला पोहोचले.

कतारमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, 'आज (26 मे 2025) सकाळी भारतीय शिष्टमंडळाने कतारचे परराष्ट्र राज्यमंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल खुलैफी यांची भेट घेतली आणि पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाची माहिती दिली.'

दुसऱ्या एका पोस्टमध्ये, दूतावासाने म्हटले की, 'परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी कतारची भारतासोबत एकता, प्रादेशिक स्थिरता आणि समृद्धीसाठी दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीवर सहमती दर्शवली.' दरम्यान, याच शिष्टमंडळाने रविवारी कतार शूरा कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. हमादा अल सुलैती आणि इतर कतारी संसद सदस्यांची भेट घेऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली होती.

या दौऱ्यातून सीमापार दहशतवादावर भारताची एकजूट भूमिका प्रतिबिंबित होते, यावर शिष्टमंडळाने भर दिला. सुप्रिया सुळेंव्यतिरिक्त, शिष्टमंडळात भाजप नेते राजीव प्रताप रुडी, अनुराग ठाकूर आणि व्ही मुरलीधरन, काँग्रेस नेते मनीष तिवारी आणि आनंद शर्मा, टीडीपी नेते लवू श्रीकृष्ण देवरायलू, आप नेते विक्रमजीत सिंह साहनी आणि माजी राजनयिक सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तलाही भेट देईल. कतार हा पश्चिम आशियाई प्रदेशात प्रभावशाली मानला जातो आणि प्रादेशिक संघर्षांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावतो.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSupriya Suleसुप्रिया सुळेQatarकतार