शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

दोन दिवसांपासून २६० प्रवासी अडकले तुर्कीतल्या विमानतळावर; लंडनहून मुंबईला येत होते विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:26 IST

भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कस्थानमधील विमानतळावर अडकून पडले आहेत.

Turkey Diyarbakir Airport: भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कीमधील विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. लंडनहून मुंबईला येणारे विमान दियारबाकीर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले होते. लंडन हिथ्रो येथून मुंबईला जाणारे आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे. व्हर्जिन अटलांटिकने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यासह सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील २५० हून अधिक प्रवाशांना दोन दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. सर्व प्रवासी तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर ४० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. २ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणारे VS358 हे विमान आपत्कालीन परिस्थितीमुळे दियारबाकीर विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, लँडिंग केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र त्यानंतर प्रवाशांची मुंबईल्या परतण्याबाबत कोणतीही सुविधा करण्यात आली नव्हती.

विमानातल्या बिघाडानंतर क्रूला हॉटेलमध्ये नेण्यात आले तर प्रवाशांना छोट्या प्रादेशिक विमानतळामधील भागात थांबवण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना दोन दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीनंतर काही प्रवाशांना जवळच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी दुसरे विमान तयार होईल, असे एअरलाइनने सांगितले होते. मात्र काही प्रवासी अजूनही विमानतळ ट्रान्झिट होल्डिंग एरियामध्ये आहेत.

अडकलेल्या प्रवाशांपैकी एकाने पीटीआयला सांगितले की, त्यांना जमिनीवर बसण्यास भाग पाडले गेले. त्यांना ब्लँकेटही देण्यात आले नाही. याशिवाय, शाकाहारी जेवण उपलब्ध नाही, असे एका प्रवाशाने सांगितले. मात्र व्हर्जिन अटलांटिकने सांगितले की, तुर्कीमध्ये प्रवाशांना रात्रीसाठी हॉटेल आणि अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. २७५ प्रवाशांमध्ये एक शौचालय आहे. त्यांच्याकडे अडॅप्टर नसल्याने फोनची बॅटरी संपत आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेहाचे रुग्ण आणि वृद्धांना हा त्रास सहन करावा लागतोय, असेही एका प्रवाशाने सांगितले.

दरम्यान, तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर सक्रिय भूमिका घेतली आहे. भारतीय दूतावासाने एअरलाइन, दियारबाकीर विमानतळ संचालक आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. दूतावासाने या प्रकरणावर एक निवेदन जारी करुन प्रवाशांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. ही समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी पर्यायी विमान व्यवस्था करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असेही दूतावासाने म्हटलं. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ