शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत 105 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 15:25 IST

हे मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे.

ढाका- अंमली पदार्थांविरोधात बांगलादेशने हाती घेतलेल्या कारवाईत आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी आणि तपास संस्थांनी गेल्या पंधरावडाभरात ही कारवाई हाती घेतली आहे. संपुर्ण देशभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.हे 105 लोक अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे आहेत असे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील गुन्हे अन्वेषण विभाग, शीघ्रकृतीदल तसेच पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र या लोकांच्या मृत्यूवर मानवाधिकार संघटना आणि विविध देशांच्या राजनयिकांनी आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या हत्या म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्ज आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.काल रात्री शीघ्रकृती दल आणि पोलिसांच्या कारवाईत 12 लोकांचे प्राण गेले आहेत.  बांगलादेशाच्या पंतप्रधान 15 मे रोजी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात देशव्यापी कारवाई करणारी मोहीम हाती घेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र या मोहिमेत मृत्युमुखी पडलेले लोक रस्त्याच्या कडेला खड्ड्यांमध्ये सापडले आहेत. अंमली पदार्थांची कथित तस्करी करणारे हे लोक आमच्या कारवाईत मृत्युमुखी पडले नसून ते त्यांच्या अंतर्गत भांडणांमुळेच मेले आहेत अशी सुरक्षा दलांनी भूमिका घेतली आहे.अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम थांबणार नसल्याची माहिती बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले. बांगलादेशामध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत नाही मात्र पण गेली काही वर्षे याबा नावाच्या अंमली पदार्थाचे चे केंद्र झाले आहे. याबा या पदार्थाला हॉर्स ड्रग असेही म्हणतात. हा अंमली पदार्थ प्रामुख्याने शेजारच्या म्यानमारमधून बांगलादेशात येतो. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशDrugsअमली पदार्थPoliceपोलिस