अंडाकृती ट्री हाउस

By Admin | Updated: January 7, 2017 05:01 IST2017-01-07T05:01:28+5:302017-01-07T05:01:28+5:30

अंडाकृती ट्री हाऊस? विश्वास बसत नाही ना?, पण हे सत्य आहे.

Oval tree house | अंडाकृती ट्री हाउस

अंडाकृती ट्री हाउस


ओटावा : अंडाकृती ट्री हाऊस? विश्वास बसत नाही ना?, पण हे सत्य आहे. कॅनडातील योएल एलन यांनी व्हिस्टलरच्या जंगलात असे अंडाकृती घर उभारले आहे. संगणकातील तज्ज्ञ असलेल्या आणि आता कारपेंटर अशी ओळख निर्माण केलेल्या योएल यांनी अतिशय गोपनीयतेने हे काम सुरू केले. एकीकडे शहरात घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती अन् जागेचा अभाव या पार्श्वभूमीवर योएल यांनी ही भन्नाट कल्पना काढली. घर तर हवं आहे आणि अधिक पैसाही खर्च व्हायला नको. म्हणून त्यांनी जंगलाचा मार्ग निवडला आणि सार्वजनिक जागेत झाडाला अंडाकृती आकार देत त्यांनी हे काम सुरू केले. योएल यांची मेहनत फळाला आली आाणि पाहता पाहता या झाडाभोवती त्यांनी अंडाकृती घर उभे केले.

Web Title: Oval tree house