जोहान्सबर्ग : कोरोनाच्या संसर्गामुळे दक्षिण आफ्रिकेतील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. जुलैपर्यंत काही लाख रुग्ण देशांमध्ये असतील. जसजशी थंडी सुरू होईल, तसतशी रुग्णांची संख्या वाढत जाईल, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. सलिम अब्दुल करीम यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, सरकारने तीन महिन्यांपूर्वी देशभर निर्बंध लागू केल्याने स्थिती हाताबाहेर गेली नाही. सरकारने वेळेत तो निर्णय घेतला. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत आफ्रिकेत स्थिती नियंत्रणात राहिली. पण आता हळुहळू निर्बंध शिथिल केले जात आहे आणि तसे करणे भागच आहे. पण जुलै महिन्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, अशी भीती वाढत आहे. जुलैपासून थंडीला सुरुवात होईल आणि काही वेळा तर कडाक्याची थंडी असेल. अशाकाळात कोरोनाचा संसर्ग वाढल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. डॉ. करी म्हणाले की, गेल्या पंधरवड्यांपासून देशात रुग्ण आणि मृत्यू यांचे प्रमाण दुप्पट होताना दिसत आहे. पण स्थिती बिघडू नये, यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे...................निर्बंध कमी करण्याने वाढनिर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे. पण ज्या वेगाने ते कमी करण्यात आले, त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लोक नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडले की त्यांचा इतरांशी संपर्क येणे स्वाभाविकच असते. त्यातून संसर्ग वाढतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. केप टाऊ न आणि काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पुन्हा निर्बंध घालावे लागतील.
CoronaVirus News : 'या' देशात जुलैमध्ये वाढेल कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 03:43 IST