जर्मनीत काटकसर धोरणाविरुद्ध उद्रेक ....
By Admin | Updated: March 18, 2015 23:40 IST2015-03-18T23:40:23+5:302015-03-18T23:40:23+5:30
आॅक्युपाय वॉलस्ट्रीट नामक आंदोलनाच्या धर्तीवर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘ब्लॉकपाय’ समूहाच्या नेतृत्वात काटकसर धोरणाविरोधात मोहीम सुरू आहे.

जर्मनीत काटकसर धोरणाविरुद्ध उद्रेक ....
जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे सरकारच्या काटकसर धोरणाविरोधातील आंदोलनाचा बुधवारी मोठा उद्रेक झाला. आॅक्युपाय वॉलस्ट्रीट नामक आंदोलनाच्या धर्तीवर २०१२ मध्ये स्थापन झालेल्या ‘ब्लॉकपाय’ समूहाच्या नेतृत्वात काटकसर धोरणाविरोधात मोहीम सुरू आहे. बुधवारी आंदोलकांनी युरोपियन केंद्रीय बँकेचे मुख्यालय, विमानतळ आणि बँकांना लक्ष्य केले. ‘ब्लॉकपाय’ हा भांडवलशाहीविरोधी व डाव्या विचाराच्या लोकांचा समूह असून २०१२ पासून युरोपात आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाच्या हक्कांसाठी लढा देत आहे.
आगडोंबाचे कारण...
फ्रँकफर्ट येथील युरोपियन बँकेचे मुख्यालय सुरू होण्याच्या तोंडावर बुधवारी आयोजित रॅलीत जर्मनीसह युरोपातील हजारो लोक सहभागी झाले होते. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांना काटकसरीचे धोरण अवलंबण्यास भाग पाडण्यासाठी ही बँक जबाबदार असल्याचा आरोप आहे.