...अन्यथा तुम्ही लवकर म्हातारे व्हाल
By Admin | Updated: February 3, 2017 00:33 IST2017-02-03T00:33:15+5:302017-02-03T00:33:15+5:30
कॅलिफोर्नियातील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सक्रिय नसलेल्या महिला लवकर म्हाताऱ्या होतात. या संशोधनात ६४ ते ९५ वर्षे वयोगटातील १५०० महिलांचा

...अन्यथा तुम्ही लवकर म्हातारे व्हाल
साक्रामेंटो : कॅलिफोर्नियातील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सक्रिय नसलेल्या महिला लवकर म्हाताऱ्या होतात. या संशोधनात ६४ ते ९५ वर्षे वयोगटातील १५०० महिलांचा समावेश करण्यात आला होता. ज्या महिला दिवसातील बहुतांश वेळ बसून असतात किंवा रोज ४० मिनिटांपेक्षा कमी वेळ सक्रिय असतात अशा महिलांच्या पेशी सक्रिय महिलांच्या पेशींपेक्षा जैविकदृष्ट्या आठ वर्षांनी मोठ्या असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, जर आमची प्रकृती सुदृढ नसेल तर, म्हातारपणाच्या खुणा लवकर दिसू लागतात. दिवसभर १० तास एकाच जागी बसणे टाळावे. तरुणपणीच व्यायामाची सवय करणे चांगले आहे. वाढत्या वयासोबत व्यायाम सुरूच ठेवावा. अन्यथा तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता.