शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:50 IST

आंतरराष्ट्रीय सिनेजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. 

जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता लागून असलेला 90 वा ऑस्कर 2018 पुरस्कार सोहळा कॅलिफॉर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 'शेप ऑफ वॉटर' सिनेमाने ऑस्कर 2018 सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि प्रॉडक्शन डिझाईन या विभागांमध्येही 'शेप वॉटरला ऑस्कर'ने गौरवण्यात आले.'शेप ऑफ वॉटर'ला एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती.  तर क्रिस्टोफर नोलान यांच्या 'डंकर्क' सिनेमाला तीन आणि डेनिस विलेन्यू यांच्या 'ब्लेड रनर 2049' सिनेमाला 2 पुरस्कार मिळाले आहेत.

हॉलिवूडमधील प्रतिष्ठित 90वा अकादमी अवार्ड (ऑस्कर अवार्ड 2018) कार्यक्रम सोहळ्याला  भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास शानदार सुरुवात झाली. अभिनेता जिमी किमेल आणि ट्रान्सजेंडर अभिनेत्री डेनियल वेगा यांनी कार्यक्रमात पुरस्कार वितरीत केले. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ट्रान्सजेंडरनं पुरस्काराचे वितरण केले आहे.  तर यंदा अभिनेत्री मेरिल स्ट्रीपनं 21वेळा नामांकने मिळवण्याचा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीही तीन वेळा मेरिल स्ट्रीपला पुरस्कारनं गौरवण्यात आले आहे. दरम्यान, सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 ला तर शशी कपूर यांचे 4 डिसेंबर 2017ला निधन झाले होते. 

'ऑस्कर'चे मानकरी

 वर्ग

विजेता
लाइव अॅक्शन शॉर्टद सायलंट चाइल्ड (क्रिस ओवर्टन आणि रॅचेल शेंटन)
बेस्ट एडिटिंग डंकर्क (ली स्मिथ)
बेस्ट व्हिज्युअल इफेक्टब्लेड रनर 2049 
बेस्ट अॅनिमेटेड फिल्मकोको
बेस्ट शॉर्ट फिल्म-अॅनिमेटेडडिअर बास्केटबॉल'
बेस्ट फॉरेन लॅग्वेज फिल्मअ फॅन्टॅस्टिक वुमन
बेस्ट प्रॉडक्शन डिझाईनशेप ऑफ वॉटर
बेस्ट साउंड मिक्सिंगडंकर्क (रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन)
बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर

इकारस

बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन     फँटम थ्रेड
बेस्ट मेकअप अँड हेअर स्टाइल    डार्केस्ट आवर
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरसॅम रॉकवेल  
बेस्ट पिक्चरद शेप ऑफ वॉटर  
बेस्ट डायरेक्टरद शेप ऑफ वॉटर(गिलर्मो डेल टोरो)
बेस्ट अॅक्टरगॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)
बेस्ट अॅक्ट्रेसफ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) 
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसएलिसन जेनी
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेगेट आउट (जॉर्डन पीले)
  

 

 

अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सनं कार्यक्रमादरम्यान आपले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.  2012 साली प्रदर्शित झआलेल्या "सिल्व्हर लाइनिंग प्लेबुक" या सिनेमासाठी जेनिफर लॉरेन्सला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेससाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.  जेनिफर लॉरेन्स 2015-16 मध्ये हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती.  

 

 

 

 

 

 

 

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकने

सर्वोत्कृष्ट चित्रपटकॉल मी बाय युअर नेमडार्केस्ट आवरडंकर्कगेट आऊटलेडी बर्डफँटम थ्रेडद पोस्टद शेप ऑफ वॉटरथ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)जॉर्डन पीले (गेट आऊट)ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)मार्गो रॉबी (आय टोन्या)साईरसे रोणान (लेडी बर्ड)मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेताटिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीमेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)अॅलिसन जेनी (आय टोन्या)सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेताविलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

टॅग्स :Oscars 2018ऑस्कर अवॉर्ड्स २०१८cinemaसिनेमाOscar nominationsऑस्कर नामांकनेOscarऑस्कर