शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन पासपोर्टच्या डिलिव्हरीसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 23:13 IST

मला दोन आठवड्यात व्हिसासाठी मुलाखत द्यायची आहे. माझा पासपोर्ट नेमका कुठे पाठवला जाईल, हे मला कसे कळेल?

प्रश्न: मला दोन आठवड्यात व्हिसासाठी मुलाखत द्यायची आहे. माझा पासपोर्ट नेमका कुठे पाठवला जाईल, हे मला कसे कळेल? पासपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी कोणते पर्याय आहेत?

उत्तर- तुम्ही नेमकं कोणतं पिकअप लोकेशन निवडलं आहे, ते ustraveldocs.com वर जाऊन तपासू शकता. 

तुमचा व्हिसा मंजूर झाला असल्यास, तो साधारणतः दोन ते पाच कार्यालयीन दिवसांत तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुमचा पासपोर्ट तयार असल्याची माहिती एसएमएस आणि इमेलद्वारे दिली जाते. तुमचा पासपोर्ट नेमका कुठे आहे, याची माहिती http://cdn.ustraveldocs.com/in/in-niv-passporttrack.asp वर मिळेल. तुमचा पासपोर्ट क्रमांक टाकल्यावर ती माहिती उपलब्ध होईल. तुम्ही ustraveldocs.com वर जाऊन पासपोर्ट डिलिव्हरीचा पत्ता बदलू शकता. पण तो तुम्हाला मुलाखतीच्या दिवशीच बदलावा लागेल. 

कुरिअर सर्व्हिस किंवा होम डिलिव्हरीचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्हिसा अर्ज काढताना तुम्ही 'प्रीमियम डिलिव्हरी सर्व्हिस'चा पर्याय निवडू शकता. त्याने पासपोर्ट तुमच्या घरी किंवा तुम्ही अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर येईल. 

पाचशे रुपयांचं कॅश ऑन डिलिव्हरी शुल्क भरल्यावर पासपोर्ट होम डिलिव्हरी सर्व्हिस उपलब्ध आहे. जेव्हा कुरिअर तुमच्या घरी येईल, तेव्हा तुम्हाला सरकारकडून जारी करण्यात आलेलं ओळखपत्र दाखवावं लागेल. तुम्हाला कुरिअरने पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं मिळाल्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं जाईल. 

कुरिअर तुमच्यापर्यंत न पोहोचल्यास, त्याची डिलिव्हरी करण्यास आलेली व्यक्ती 'सॉरी कार्ड' आणि रेफरन्स नंबर देऊन जाईल. तुम्हाला ते कार्ड मिळाल्यास, कार्डवरील नंबरच्या मदतीने तातडीनं कुरिअर कंपनीशी संपर्क साधा.

तुम्ही व्हिसा अप्लिकेशन सेंटर किंवा ब्ल्यू डार्ट लोकेशनवरूनही पासपोर्ट मिळवू शकता. या सेवेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तुमचा पासपोर्ट स्वीकारण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव देऊ शकता. तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या बाबतीतही तुम्ही हा पर्याय निवडू शकता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पासपोर्ट स्वीकारण्याची परवानगी देत असाल, तर तुम्हाला तसं पत्र सर्व अर्जदारांच्या स्वाक्षऱ्यांसह द्यावं लागेल. याबद्दलची अधिक माहिती http://cdn.ustraveldocs.com/in/in-loc-passportcollection.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  व्हिसा अप्लिकेशन सेंटरमधून 14 दिवसांत (ब्ल्यू डार्टच्या लोकेशनवरून 7 कार्यालयीन कामकाजांच्या 7 दिवसांत) पासपोर्ट घेऊन न गेल्यास तो अमेरिकेच्या संबंधित दूतावासाकडे परत जातो. त्यानंतर अर्जदाराला त्याचा पासपोर्ट थेट अमेरिकेच्या दूतावासाकडून घ्यावा लागतो. 

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसाIndiaभारतpassportपासपोर्ट