शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:32 IST

पोलिसांचे सहाय्य : सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांना सोशल मिडीयावरून समजली बातमी

बीड : नुकत्याच झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झाल्यानंतर आपल्या वेदना मांडताना बीड तालुक्यातील उखंडा येथील पार्वती मारोती कदम यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्याच शब्दात लोकमतने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत भारतीय असलेले परंतु सध्या हाँगकाँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी बीड पोलिसांमार्फत कदम कुटुंबाला ५० हजार रूपयांची मदत केली आहे. त्यांना ही बातमी सोशल मिडीयावरून समजली होती.

अवकाळी आणि कुठे मुसळधार तर कुठे अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकºयांच्या शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ५१४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. दरम्यान लोकमतने थेट बांधावर जात पीडित शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. बीड शहरापासून १८ - २० किलोमीटर अंतरावर उखंडा- पिठ्ठी येथील कदम कुटुंबातील पार्वती आणि मारोती हे दाम्पत्य हताश दिसून आले. पावसाने भिजलेली बाजरीची कणसे घरासमोर आणि रस्त्यालगत वाळण्यास घातली होती. या रस्त्याने प्रवास करताना ही बाब लोकमत प्रतिनिधी व छायाचित्रकाराच्या निदर्शनास आली तोच दुचाकी थांबवून पार्वती कदम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना, रानात पसाभरही आलं नाही. लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरण येत नाय’ अशी कैफियत पार्वती कदम यांनी मांडली होती. या संदर्भात १७ नोव्हेंबरच्या अंकात लोकमतने ‘असं वाटतं मरु तर बरं, पण मी मरायची नाय..’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. लोकमत आॅनलाईनद्वारे लिंक शेअर केली होती. सोशल मिडीयावरही दिवसभर ही बातमी वाचणारे आपल्या संबंधित मित्रांच्या ग्रुपवर पोस्ट करत होते. बातमीला लाईक करतानाच दातृत्वाचा भाव जागा होत होता. वाचताना मन हेलावल्याचे राज्यातील अनेक वाचकांनी बीड कार्यालयात प्रस्तुत प्रतिनिधीशी फोनद्वारे संपर्क करुन सांगतानाचा मदतीची भावना व्यक्त केली. तर सोशल मिडियावर ही बातमी वाचून सध्या हॉँगकॉँगमध्ये असणारे सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांनी त्यांच्या परिचितांशी संपर्क करत बीड पोलिसांमार्फत पार्वती मारोती कदम यांच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत केली.  पाटील हे भारतीय रहिवासी असून ६ महिन्यांपासून हॉँगकॉगमध्ये ते राहतात. 

लोकमतच्या बातमीची दखल घेऊन कदम दाम्पत्याला ५० हजारांची मदत

दरम्यान ठाणे येथील स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम, उमरग्याचे विनायक पाटील, बारामतीचे अ‍ॅड. नितीन भामे यांच्यासह अनेकांनी मानवतेच्या दृष्टीतून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीdroughtदुष्काळMumbaiमुंबईfarmer suicideशेतकरी आत्महत्या