Operation 'Spider Web : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव नाही. आता युक्रेनने रशियाच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यासंदर्भात खुद्द युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. युक्रेनने केलेल्या या हल्ल्याची प्लॅनिंग जवळपास दीड वर्षांपासून सुरू होती, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. युक्रेनने थेट रशियात घुसून त्यांच्या एयरबेसवरच हल्ला केला.
झेलेन्स्की यांनी 'एक्स'वर लिहिले, "युक्रेनच्या सिक्योरिटी ऑपरेशनचे प्रमुख वसील मालियुक यांनी आजच्या ऑपरेशनसंदर्भातील अहवाल सादर केला आहे. याचा परिणाम चांगला राहिला. एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवसांपूर्वीच, यासंदर्भातील प्लॅनिंग सुरू करण्यात आली होती आणि हे आमचे सर्वात लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. ऑपरेशनच्या तयारीत सहभागी असलेल्या आमच्या लोकांना वेळ असतानाच रशियन हद्दीतून बोलावून घेण्यात आले. युक्रेनच्या या यशाबद्दल जनरल मालियुक यांचे आभार."
झेलेन्स्की यांनी पुढे लिहिले की, "या ऑपरेशनसंदर्भात जनतेला माहिती देण्यात यावी, असे निर्देश मी युक्रेनच्या सिक्योरिटी सर्व्हीसला दिले आहेत. तुर्तास सर्व काही सांगता येणार नाही, मात्र, युक्रेनची ही कारवाई इतिहासाच्या पुस्तकात नोंदवली जाईल. रशियाने युद्ध सुरू केले आहे, रशियाने ते संपवावे. ग्लोरी टू यूक्रेन!''
युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवर हल्ला - रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी खुलासा केला की, युक्रेनियन ड्रोनने पाच एअरबेसवर हल्ला केला. यात अज्ञात संख्येत विमानांचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी युक्रेनने, आपण रविवारी एका ऑपरेशनअंतर्गत रशियन एअरबेसवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करून सुमारे 41 रशियन विमाने उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यासाठी एकूण 117 ड्रोनचा वापर करण्यात आला, या हल्ल्यासाठी एवढेच ड्रोन ऑपरेटर्सदेखील सहभागी होते. एअरबेसवर तैनात 34% क्रूज मिसाइल वाहकांना लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यासंदर्भात रशियन संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यात ''आज, कीव शासनाने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इव्हानोवो, रियाझान आणि अमूर येथील हवाई तळांवर एफपीव्ही ड्रोनच्या सहाय्याने दहशतवादी हल्ले केले. इव्हानोवो, रियाझान आणि अमूर येथील लष्करी हवाई तळांवर सर्व दहशतवादी हल्ले हाणून पाडण्यात आले." तसेच, ''मर्मंस्क आणि इर्कुत्स्क भागात सैन्य हवाई तळांच्या जवळच्या भागांतून एफपीव्ही ड्रोन सोडले गेल्याने, अनेक विमानांना आग लागली. मात्र ही आग विझवण्यातही आली, असेही रशियन संरक्षण मंत्रालयाने