शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

शेपूट वाकडं ते वाकडंच! पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:42 IST

Operation Sindoor: दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला.

Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरातील मीडियावर तोंडघशी पडलेला पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील दहशतवाद्यांना पोसणारा देश, अशी ओळख निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवाद्यांनाच जवळ केले आहे. पाकिस्तानमधून काही फोटो समोर आले आहे, ज्यात लष्कर, जैशचे कुख्यात दहशतवादी आणि शाहबाज शरीफ यांचे मंत्री एकाच मंचावर दिसत आहेत.

28 मे रोजी पाकिस्तानच्या पंजाबमध्ये युम-ए-तकबीरनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 1998 मध्ये याच दिवशी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चगाई येथे यशस्वीरित्या अणुचाचणी करुन अणुसंपन्न राष्ट्र बनले. परंतु या युम-ए-तकबीर कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांचे अनेक मंत्री कुख्यात दहशतवाद्यांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. पाकिस्तानचे अन्न मंत्री मलिक रशीद अहमद खान आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक मुहम्मद अहमद खान हे लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी सैफुल्लाह कसुरी, हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद आणि आमिर हमजा यांच्यासोबत बसलेले दिसतात. हे दोन्ही मंत्री पंतप्रधान शाहबाज यांचे खूप जवळचे आहेत.

या कार्यक्रमात दहशतवादाचे गौरव करण्यात आले आणि भारताविरुद्ध चिथावणीखोर भाषणेही देण्यात आली. दहशतवाद्यांपासून अंतर ठेवण्याऐवजी, शाहबाजचे हे मंत्री मंचावर दहशतवाद्यांचे स्वागत करताना, त्यांना मिठी मारताना, त्यांचे कौतुक करताना आणि पाकिस्तानच्या संरक्षणात या दहशतवाद्यांच्या भूमिकेचे गौरव करताना दिसले. शाहबाजचे मंत्री मलिक रशीद यांनी उघडपणे जाहीर केले की, पाकिस्तानच्या 24 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व हाफिज सईद आणि सैफुल्लाह कसुरी सारखे लोक करत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सैफुल्लाह कसुरीची या कार्यक्रमात उपस्थिती सर्वात आश्चर्यकारक होती. पहलगाम हल्ल्यानंतर कसुरी भूमिगत झाला होता. 24  मिनिटांच्या द्वेषपूर्ण भाषणात कसुरीने अभिमानाने सांगितले की, पहलगाम हल्ल्यासाठी मला जबाबदार धरण्यात आले होते आणि आता संपूर्ण जग माझे नाव ओळखते. या कार्यक्रमात कसुरीची उपस्थिती आयएसआयने बहावलपूरमध्ये कसुरीला आश्रय दिल्याच्या गुप्तचर माहितीची पुष्टी करते.

यादरम्यान, लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आमिर हमजा खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो आणि व्हिडिओ आयएसआय आणि लष्कर यांच्यातील संबंधांची पुष्टी करतात.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी