शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:21 IST

Operation Sindoor: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. या कारवाईत भारताने पाकमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईदरम्यान, आपल्याला बंकरमध्ये लपावे लागले होते, अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाई

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ठोस कारवाई करत मे महिन्याच्या सुरुवातीला ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर, तसेच त्यानंतर पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर तीव्र हल्ले करण्यात आले.

झरदारींची कबुली

या संपूर्ण घडामोडींवर एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले. झरदारी म्हणाले, भारताने हल्ला केला, तेव्हा माझे मिलिट्री सेक्रेटरी माझ्याकडे आले आणि म्हणाले की, युद्ध सुरू झाले आहे. त्यांनी मला सुरक्षिततेसाठी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.  पण, मी त्यांना नकार दिला. बंकरमध्ये मरणार नाही, मृत्यू यायचा असेल, तर इथेच मरेल, असे मी त्यांना सांगितले, असे झरदारी म्हणाले. त्यांच्या या कबुलीवरुन भारताची कारवाई किती गंभीर होती, याची स्पष्ट जाणीव पाकिस्तानच्या नेतृत्वालाही झाली होती, हे दिसून येते.

7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात

भारताने 7 मेच्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात केली. या कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर, भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

युद्धविरामासाठी पाकिस्तानकडून पुढाकार

भारतीय कारवाईनंतर सीमारेषेवर तणाव वाढला. पाकिस्तानकडून सीमापार गोळीबार तीव्र झाला, मात्र भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पाकिस्तानला संघर्षविरामासाठी पुढाकार घ्यावा लागला. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधून सीजफायरचा प्रस्ताव मांडला, जो भारताने स्वीकारला.

English
हिंदी सारांश
Web Title : Zardari admits hiding in bunker during India's Operation Sindoor.

Web Summary : Following the Pahalgam attack, India's 'Operation Sindoor' targeted Pakistani terror camps. Zardari confessed to seeking bunker refuge during the strikes. India's decisive action forced Pakistan to request a ceasefire, exposing military vulnerabilities.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत