Operation Sindoor jaish e Mohammed Bahawalpur: पाकिस्तानच्या भूमीत राहून भारतात रक्तपात घडवणाऱ्या मसूद अजहरवर अखेर भारताने वार केला. पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान राहून भारतात घातपात घडवणाऱ्या मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदवर घाव घातला. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले.
वाचा >>कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उडवले
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरमध्ये या हे मुख्यालयच उडवले. भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हल्ल्यानंतर त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मसूद अजहर आणि त्याचे कुटुंबीयही इथे राहत होते, अशीही माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० लोक ठार झाले आहेत. तर ४ जवळच्या लोकांचाही खात्मा करण्यात आला.
जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा हल्ल्यानंतरचा व्हिडीओ बघा
कुठे आहे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय?
भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मरकज सुभानल्लाह बहावलपूरमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेपासून ते १०० किमी दूर आहे. या मुख्यालयात दहशतवाद्यांची भरती, त्यांना प्रशिक्षण आणि रणनीती इथेच रचली जात होती. संघटनेतील महत्त्वाचे दहशतवाद्यांचे इथे वास्तव्य असायचे.